Pyari Didi scheme in Delhi...
Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (6 जानेवारी) मोठी घोषणा केली आहे. 'आप'च्या महिला सन्मान योजनेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने 'प्यारी दीदी योजना' जाहीर केली आहे. दिल्लीत सत्तेत आल्यास महिलांना प्रतीमहिना 2500 रुपये देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे डीके शिवकुमार यांनी दिल्लीत ही घोषणा केली आहे.
After the successful launch of the guarantee programme in Karnataka, we are launching the "Pyari Didi" scheme in Delhi.
— Congress (@INCIndia) January 6, 2025
I am confident that the Congress government will be elected in Delhi, and we will implement the scheme of Rs 2500 to every woman on the first day.
As per the… pic.twitter.com/IqjpXarjhT
डीके शिवकुमार म्हणाले, "कर्नाटकमधील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दिल्लीत आमची सत्ता आल्यास पहिल्या मंत्रिमंडळात ही योजना राबवू. कर्नाटक मॉडेलप्रमाणे प्यारी दीदी योजनेची घोषणा करण्यासाठी मी येथे आलो आहे.'' ते पुढे भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले, ''भाजप आमच्या योजनेची मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रात कॉपी करत आहे.''
आम्ही राज्यघटनेत दिली होती हमी - शिवकुमार
डीके शिवकुमार म्हणाले, "मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आम्ही शिक्षण, अन्न सुरक्षा आणि रोजगाराबाबत हमी दिली होती. आम्ही संपूर्ण कागदपत्र आणि घटनेनुसार ही हमी दिली होती. दिल्लीतील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आम्ही अनेक वर्षे देशावर राज्य केले. मी दिल्लीच्या जनतेला आवाहन करतो की, "आम्हाला आणखी एक संधी द्या जेणेकरून आम्ही देश आणि दिल्ली बदलू शकू."
विरोधकांचा आम आदमी पक्षाला सवाल....
दरम्यान, सत्ताधारी आम आदमी पक्षाने महिला सन्मान योजनेंतर्गत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले असून त्यासाठी नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आम आदमी पक्षाला कोंडीत पकडले असून, "पक्ष सत्तेत असताना आतापासून याची अंमलबजावणी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे?" असा सवाल केला आहे.