जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अंतरिम जामीन मंजूर

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 7 Jan 2025
  • 01:50 pm
asaram bapu,Rajasthan,murder,rape,'pune,. Crime,parole,SUPREME COURT,COurt,Crime  News marathi news ,  maharashtra  maharashtra news , news marathi  latest marathi news,आसाराम बापू, राजस्थान, हत्या, बलात्कार, 'पुणे,. गुन्हे, पॅरोल, सर्वोच्च न्यायालय

संग्रहित

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच, सुटकेनंतर अनुयायांना न भेटण्याचे निर्देशदेखील देण्यात आलं आहेत.बापूंवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आसाराम बापू शिक्षा भोगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूला हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी खोपोलीत एका आयुर्वेदिक रुग्णलायमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणासाठी आसारामला 31 मार्चपर्यंत अंतिरम जामीन मंजूर केला आहे. यासोबत न्यायालयाने जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

 

85 वर्षीय आसाराम बापू 2013 पासून जोधपूर तुरुंगात बंद आहे. जोधपूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पाच वर्षाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर 2018 मध्ये न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दुसऱ्या एका प्रकरणातही आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आला आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील आश्रमातील एका महिलेने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

 

 

Share this story

Latest