HMPV Virus | देशात HMPV चे रुग्ण वाढले..! 30 टक्के प्रकरणे महाराष्ट्रात; जाणून घ्या, कोण-कोणत्या राज्यात पसरला संसर्ग...

HMPV Virus in India : आता मुंबईत एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात सहा महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 8 Jan 2025
  • 10:07 am

प्रातिनिधिक छायाचित्र....

HMPV Virus in India | चीनपाठोपाठ भारतातही ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) च्या आगमनामुळे चिंता वाढू लागली आहे. आता मुंबईत एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात सहा महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. यासह भारतात आजपर्यंत एकूण 8 प्रकरणांची नोंद झाली आहे. बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि अहमदाबाद आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक प्रकरण नोंदवण्यात आले आहे.

कोविड-19 सारखा व्हायरस नाही...

चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने भारतातील लोकही घाबरू लागले आहेत. काही लोक या आजाराची तुलना कोविड-19 शी करू लागले आहेत, त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की,  "एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. ते म्हणाले की, 2001 मध्ये याची प्रथम ओळख झाली होती आणि अनेक वर्षांपासून तो जगभरात पसरत आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, चीनमध्ये एचएमपीव्हीची प्रकरणे वाढत आहेत, ज्यावर भारत सरकार लक्ष ठेवून आहे.

6 महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण....

मुंबईत ज्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे ती फक्त सहा महिन्यांची आहे. 1 जानेवारीला गंभीर खोकला, छाती जड होणे आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरल्याने मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.डॉक्टरांनी नवीन रॅपिड पीसीआर चाचणीद्वारे पुष्टी केली आहे की तिला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. मुलीवर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्ससारख्या औषधांसह उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पाच दिवसांनी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.

दरम्यान, बीएमसीच्या आरोग्य विभागाने सांगितले की, त्यांना या प्रकरणाचा कोणताही अहवाल मिळालेला नाही, परंतु त्यांनी इन्फ्लूएंझा आणि गंभीर श्वसन संक्रमणासाठी विशेष दक्ष राहण्यास सुरूवात केली आहे. डॉक्टर असे सांगत आहेत की, एचएमपीव्ही विषाणू हा मुख्यत्वे मुले आणि वृद्धांवर अनेक दशकांपासून प्रभावित करतो, परंतु यामुळे कोविड सारखी महामारी होऊ शकत नाही.

HMPV ची लक्षणे....

मानवी मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही हा एक विषाणू आहे ज्यामुळे मानवी फुफ्फुस आणि श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. यामुळे सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखी स्थिती निर्माण होते. आधीच आजारी असलेल्या किंवा ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये HMPV संसर्ग सामान्य आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (६ जानेवारी) सांगितले की, इतर काही राज्यांमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) ची प्रकरणे समोर आल्यानंतर लोकांनी घाबरून जाऊ नये. फडणवीस म्हणाले की, त्यांचे सरकार लवकरच परिस्थितीबाबत सर्वसमावेशक अ‍ॅडव्हायजरी जारी करेल.

Share this story

Latest