पुरुषाच्या संमतीशिवाय काढू शकणार शुक्राणू

कोची: केरळ उच्च न्यायालयाने गंभीर आजारी पुरुषाचे शुक्राणू काढून त्याचे जतन करण्यास (क्रायोप्रिझर्वेशन) मान्यता दिली आहे. याबाबत आजारी पुरुषाच्या पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. जेणेकरून ती असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या (एआरटी) मदतीने आई होऊ शकेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 22 Aug 2024
  • 10:51 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गंभीर आजारी व्यक्तीच्या पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाचा दिलासा

कोची: केरळ उच्च न्यायालयाने गंभीर आजारी पुरुषाचे शुक्राणू काढून त्याचे जतन करण्यास (क्रायोप्रिझर्वेशन) मान्यता दिली आहे. याबाबत आजारी पुरुषाच्या पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. जेणेकरून ती असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या (एआरटी) मदतीने आई होऊ शकेल.

न्यायमूर्ती व्हीजी अरुण यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की शुक्राणू काढण्यासाठी व्यक्तीची संमती आवश्यक नाही, कारण ती व्यक्ती संमती देण्याच्या स्थितीत नाही. शिवाय त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. वास्तविक, एआरटी रेग्युलेशन कायद्यात अशी तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीचे शुक्राणू काढण्यासाठी त्याची लेखी संमती घ्यावी लागेल.

महिलेच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, ‘‘त्यांच्या पतीची स्थिती अशी नाही की त्याची लेखी संमती घेता येईल. या प्रकरणाला आणखी उशीर झाला तर कधीही काहीतरी वाईट घडू शकते.’’

यावर कोर्ट म्हणाले, ‘‘परिस्थिती लक्षात घेऊन आणि या परिस्थितीसाठी कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसताना समानता राखून याचिकाकर्त्याला अंतरिम दिलासा दिला जातो.’’ मात्र, शुक्राणू काढणे आणि जतन करणे याशिवाय अन्य कोणतीही प्रक्रिया न्यायालयाच्या परवानगीशिवाय केली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest