Supriya Sule : इतना तो हक बनता है! ‘कधी प्रेमाने, कधी टीका करताना, मोदींना पवारांचे नाव घ्यावेच लागते’

महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शरद पवारांचं (Sharad Pawar) नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, तर कधी टीका करताना. महाराष्ट्रात आलेल्यांना आणि राज्यातील नेत्यांना पवारांचे नाव घेतले तरच राजकारण करता येते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 28 Oct 2023
  • 01:39 pm
Supriya Sule

संग्रहित छायाचित्र

सुप्रिया सुळेंचा मिश्किल टोला

महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शरद पवारांचं (Sharad Pawar) नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, तर कधी टीका करताना. महाराष्ट्रात आलेल्यांना आणि राज्यातील नेत्यांना पवारांचे नाव घेतले तरच राजकारण करता येते. राजकारणात एवढं तर चालतंच, इतना तो हक बनता है, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या संसद सदस्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधानांना मिश्किल टोला लगावला आहे. (NCP)

पंतप्रधान गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीत दर्शन घेऊन नंतर निळवंडे धरणाचं लोकार्पणही केलं. त्योवळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्याला उत्तर देताना सुळे यांनी हा टोला लगावला आहे. 

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पोस्टमध्ये मोदी यांना बरीच उत्तरे दिली आहेत. एकतर मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्या  शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, महाराष्ट्रात आल्यावर ते शरद पवारांचं नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, कधी टीका करताना. राजकारणात एवढं तर चालतंच, इतना तो हक बनता है. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी नेहमीच नॅचरल करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींनी कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला नाही, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला. अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याच्या काही दिवस आधीच मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असा करत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या संदर्भात आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना पंतप्रधान मोदी असे म्हणाले होते की,  महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषिमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला, पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. आता मोदी यांच्या टीकेला शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींच्या पूर्वीच्या भाषणाचा व्हीडीओ शेअर केला आहे. ते एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हणतात की, किती हा विरोधाभास? शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात शरद पवारांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती. या व्हीडीओमध्ये “शरद पवारांच्या डोक्यात गाव, शेतकरी, शेतीतील आधुनिकता यावर कायम विचार राहतात. शरद पवारांची शेतीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची पद्धत आहे”, असं मोदी सांगताना दिसत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest