धक्कादायक! चालत्या रुग्णवाहिकेत महिलेचे लैंगिक शोषण

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली. रुग्णालयातून आपल्या पतीला रुग्णवाहिकेतून घरी जाताना एका महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. एवढेच नव्हे तर या दोघांनाही नंतर रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Sep 2024
  • 04:53 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, कर्मचाऱ्याने पीडितेच्या पतीचा ऑक्सिजन काढून घेतला

लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली. रुग्णालयातून आपल्या पतीला रुग्णवाहिकेतून घरी जाताना एका महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. एवढेच नव्हे तर या दोघांनाही नंतर रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

पीडित महिलेचा पती हरीश काही दिवसांपासून आजारी होता. पीडितेने पतीला जवळच्या बस्ती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. परंतु, त्याची प्रकृती खालावल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. परंतु, खासगी रुग्णालय परवडत नसल्याने तिने पतीला घरी नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातून घरी जाताना रुग्णवाहिका चालकाने तिला बळजबरीने रुग्णवाहिकेत बसवले. तर रुग्णवाहिका कर्मचाऱ्याने तिचा लैंगिक छळ केला. या विरोधात तिने आरडाओरडा केला. तेव्हा तिच्या पतीचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला. तसेच, पतीसह तिला रुग्णवाहिकेतून बाहेर फेकण्यात आले. रुग्णवाहिका चालकाने तिचे दागिनेही चोरल्याचा आरोप तिने केला. ऑक्सिजनचा पुरवठा काढून रुग्णवाहिकेबाहेर फेकल्याने तिचा पती गंभीर जखमी झाला होता. पीडितेने आपल्या भावाला फोनवर ही सर्व हकिगत सांगितली. त्याने तत्काळ या विरोधात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला.

रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यासाठी पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकरणी तिने लखनऊच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. लखनौ उत्तरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्र दुबे यांनी सांगितले की, सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका महिलेने लखनौच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या मारहाणीबाबत तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest