Karni Sena President Death : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ
जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (National Rajput Karni Sena) राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (sukhdev singh gogamedi) यांची गोळ्या (Firing) झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये गोगामेडी यांच्या श्यामनगर येथील घरात घुसून गोळीबार करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हा हल्ला केला. या गोळीबारात सुखदेव सिंह गोगामेडी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 2 सुरक्षा रक्षक देखील गंभीर जखमी झाले असून यामध्ये एक मारेकरी सुद्धा मारला गेला आहे. दरम्यान या घटनेनेत देशभरात एकच खळबळ उडाली आहे. (Karni Sena President Death)
याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जयपूर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगामेडी दुपारी 1.45 च्या सुमारास त्यांच्या घराबाहेर उभे असताना स्कूटरवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्यानंतर गोगामेडी यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत गोगामेडी यांच्यासोबत असलेले अजित सिंग हेही गंभीर जखमी झाले आहेत. तर गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. या घटनेनंतर मेट्रो मास हॉस्पिटल बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली आहे.
दरम्यान, जयपूर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या इतर शहरातील पोलिसां देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोहित गोदारा याने या हत्त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.