'नवरत्न तेल', 'बोरोप्लस क्रिम' ही सौंदर्यप्रसाधने नव्हे तर औषधे!

तेलंगणा उच्च न्यायालयाने हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर, हिमानी निरोगी दंत मंजन लाल, सोना चांदी च्यवनप्राश यासारखे प्रोडक्ट कॉस्मेटिक आहेत की ड्रग्ज या संदर्भातील महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. म्हणजेच वरील सहा प्रोडक्ट सौंदर्यप्रसादने आहेत की औषधे याबद्दलचा निकाल द्विसदस्यीय खंडपीठाने दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 19 Jul 2024
  • 04:28 pm
National News, Himani Navaratna oil, Anti-Septic Cream, Boroplus,  Boroplus Prinkly Heat Powder, Himani Sanshri Dental Manjan Lal, Soundaryaprasad,  Sona Chandi Chyawanprash

संग्रहित छायाचित्र

हैद्राबाद: तेलंगणा उच्च न्यायालयाने हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर, हिमानी निरोगी दंत मंजन लाल, सोना चांदी च्यवनप्राश यासारखे प्रोडक्ट कॉस्मेटिक आहेत की ड्रग्ज या संदर्भातील महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. म्हणजेच वरील सहा प्रोडक्ट सौंदर्यप्रसादने आहेत की औषधे याबद्दलचा निकाल द्विसदस्यीय खंडपीठाने दिला आहे. या खंडपीठामध्ये न्या. सॅम कोशे आणि न्या. एन. तुकारामजी यांचा समावेश होता.

हिमानी निरोगी दंतम मंजनला आपण कॉस्मेटिक म्हणू शकतो असे न्यायालयाने म्हटले आहे. हिमानी सोना चांदी च्यवनप्राश, नवरत्न हेअर ऑइल, हिमानी गोल्ड टर्मरिक आयुर्वेदिक क्रिम, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर हे सारे प्रोडक्ट ड्रग्ज म्हणजेच औषध असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. आंध्र प्रदेश जनरल सेल्स टॅक्स (एपीजीएसटी) कायदा १९५७ अंतर्गत हे सर्व प्रोडक्ट कॉस्मेटिक आहेत की ड्रग्ज आहेत याबद्दलचा निकाल न्यायालयाने दिला आहे. सेल्स टॅक्स अपिलेट ट्रेब्युलंट (एसटीएटी) आणि हिमानी लिमिटेड यांच्यामध्ये करासंदर्भातील वादातून हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यावरच न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

एसटीएटीने नवरत्न तेल, गोल्ड टर्मरिक आयुर्वेदिक क्रिम, निरोगी दंत मंजन लाल हे कॉस्मेटिक्स असल्याचा दावा केला होता, तर अन्य तीन प्रोडक्ट बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर आणि सोना चांदी च्यवनप्राश हे ड्रग्ज प्रकारात मोडतात असा दावा केला होता. एसटीएटीने याचसंदर्भात न्यायालयात दावा करताना जीसीएसटी कायदा आणि टीजीएसटी कायद्यानुसार या प्रोडक्टवर २० टक्के जीएसटी आकारला जावा असे नमूद केले होते. मात्र हिमानीने पहिले तीन प्रोडक्ट ड्रग्ज नसल्याचा दावा करत त्यावर १० टक्के जीएसटी आकारला जावा, असा युक्तिवाद केला होता.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत, प्रोडक्टचे गुणधर्म पडताळून पाहिले. न्यायालयाने हिमानी सोना चांदी च्यवनप्राश हे ५२ वेगवेगळ्या वनस्पती आणि मिनरल्सपासून बनवले आहे ज्यामध्ये सोने, चांदी, केशरचा समावेश असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे नमूद केले.  न्यायालयाने या संदर्भात काही आयुर्वेदिक संदर्भ दिले. अर्जदारांनी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायदा १९४० अंतर्गत परवाना घेतल्याची आठवण न्यायालयाने करून दिली. या कायद्यानुसारच एसटीएटीने या प्रोडक्टला 'कॉस्मॅटिक' आणि 'ड्रग्ज' प्रकारामध्ये विभाजित करून त्याला 'ड्रग्ज' हा दर्जा दिला. सेक्शन ३ (ब) अंतर्गत ड्रग्ज म्हणजे औषध अशा गोष्टीला म्हणतात ज्याचा वापर अंतर्गत किंवा बाह्य अवयवांवर केला जातो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest