संग्रहित छायाचित्र
महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा चटका बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागला आहे. अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ८.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांकडून ही दर वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. (LPG Price Hike)
घरगुती LPG दरात ग्राहकांना दिलासा
एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या असताना घरगुती ग्राहकांना दिलासा कायम आहे. तेल कंपन्यांनी १४.२ किलो म्हणजे घरात वापरल्या जाणाऱ्या LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीचा फटका मुंबईकरांना देखील बसला आहे. आज १ ऑगस्टपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १ हजार ६०५ रुपये झाली आहे. त्यात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे दर १ हजार ५९८ रुपये होते. चेन्नईतही एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १ हजार ८१७ रुपयांना मिळणार आहे. पूर्वी हा दर १ हजार ९०९.५० रुपये होता.
महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत
राजधानी दिल्लीत आजपासून व्यावसायिक सिलेंडर १ हजार ६५२.५ रुपयांना मिळणार आहे.इंडेनचा हा सिलेंडर १ जुलै रोजी तो १६४६ रुपये होता. यामध्ये ६.५० रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे. येथे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती १४ किलोच्या सिलेंडरची किंमत ८०३ रुपये आहे. तर १० किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडर ५७४.५ रुपयांना उपलब्ध आहे.
कोलकात्ता शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, परंतु व्यावसायिक सिलिंडर महाग झाला आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडर हा १ हजार ७५६ रुपयांऐवजी १ हजार ७६४.५ रुपयांना मिळेल.