लोकसभा निवडणुकीचा बिगुल उद्या वाजणार
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) चे बिगुल उद्या वाजणार केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. ही लोकसभा निवडणूक पाच ते सात टप्प्यात होणे अपेक्षित असून 30 मे पर्यंत नवी लोकसभा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने वेळापत्रक आखले जाण्याची अपेक्षा आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी सर्व राज्यांचा दौरा करून तिथल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडे निमलष्करी दलाचे 350000 मनुष्यबळाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने या मागणीस आधीच मंजुरी दिली आहे. निवडणुका नि:पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभर 2500 निवडणूक निरीक्षक नेमले आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राजधानीत बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
केंद्र सरकारने नेमलेले दोन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे यांनी आज निवडणूक आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. हे दोन्ही निवडणूक आयुक्त उद्याच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे.