इंदूर : गरबा खेळायचाय, मग गोमूत्र प्या; गैर हिंदूंना पेंडॉलमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षाचा प्रस्ताव

पितृपक्ष संपताच नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. नवरात्रीदरम्यान ठिकठिकाणी मंडप सजवले जातात. तरुणाईदेखील मंडपात जाऊन गरबा खेळण्यासाठी सज्ज असते. या दरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक बातमी समोर आली आहे. येथे जिल्हाध्यक्षांनी गरब्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना एक सल्ला दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Wed, 2 Oct 2024
  • 06:38 pm
garba,Pitrupaksha,Navratri,estival

File Photo

कपाळावर टिळा अनिवार्य करा

इंदूर : पितृपक्ष संपताच नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. नवरात्रीदरम्यान ठिकठिकाणी मंडप सजवले जातात. तरुणाईदेखील मंडपात जाऊन गरबा खेळण्यासाठी सज्ज असते. या दरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक बातमी समोर आली आहे. येथे जिल्हाध्यक्षांनी गरब्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना एक सल्ला दिला आहे. जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी, गरब्यासाठी मंडपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजले पाहिजे असे ते म्हणाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हिंदूंचा गोमूत्र पिण्यात कोणताही आक्षेप नाही. इतकेच नाही तर टिळा न लावता आलेल्यांनाही गरबा मंडपात प्रवेश दिला जाऊ नये, असा प्रस्तावही त्यांनी दिला आहे.

चिंटू वर्मा यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सांगितले की, गरबा मंडपात अनेक प्रकारचे लोक येत असतात. गर्दीमध्ये प्रत्येकाची ओळख पटवता येत नाही. यामुळे जे कोणी गरबा खेळण्यासाठी मंडपात येईल त्याला प्रवेश देण्याआधी गोमूत्र पाजले पाहिजे. ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पाहण्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, आजकाल कोणीही बनावट आधार कार्ड बनवू शकते. अशा स्थितीत गैर हिंदूदेखील हिंदू मंडपात प्रवेश करतात. गरबा मातेचा उत्सव आहे.

त्यामुळे मंडपात येणाऱ्या सर्वांनाच गोमूत्र पाजायला हवे. वेळोवेळी अशा चर्चा होत असतात की गर्दीतून काही लोक गोंधळ घालण्याच्या हेतूने सहभागी होतात. त्यामुळे आपण पूर्वकाळजी घेणे गरजेचे आहे. हिंदू व्यक्तींनी गरबा खेळायला येताना हिंदू संस्कृतीनुसार पेहराव, गंध-तिलक लावूनच प्रवेश करावा असे आवाहन त्यांनी केले. हिंदू गायीला माता मानतात, त्यामुळे गोमूत्र पिणे हिंदूंसाठी अडचणीचे नाही, पण गरबा मंडपात इतर धर्माचे लोक येऊन संस्कृतीला धक्का लावत आहेत. महिलांच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असल्याने वर्मा यांनी हा उपाय सुचवला आहे.

दरम्यान यावेळी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ पासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे, तर १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नवरात्री असणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest