यापुढे मुस्लिमांना लग्न, घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य

दिसपूर: आसाममध्ये आता मुस्लिमांना लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी करावी लागणार आहे. आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम समाजातील काझींची भूमिका संपणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 23 Aug 2024
  • 12:06 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

काझींची भूमिका संपणार; आसाम सरकारने घेतला निर्णय

दिसपूर: आसाममध्ये आता मुस्लिमांना लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी करावी लागणार आहे. आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम समाजातील काझींची भूमिका संपणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, राज्यात मुस्लिमांची लग्न आणि घटस्फोटासाठी सरकारी नोंदणी अनिवार्य असेल. यासाठी विधानसभेच्या आगामी सत्रात एक विधेयक आणले जाणार आहे.  आजपासून (गुरुवार) विधानसभेचे सत्र सुरू झाले आहे. त्यातही या संभाव्य विधेयकावर सांगोपांग चर्चा होणार आहे. यापूर्वी मुस्लीम विवाह समारंभ काझींच्या माध्यमातून नोंद केले जात होते. मात्र या नव्या विधेयकामुळे मुस्लीम समाजातील सर्व विवाहांची नोंदणी सरकारअंतर्गत होणार आहे. 

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी काझी अल्पवयीन मुलींच्या लग्नाची नोंदणी करीत होते. मात्र आगामी विधेयकात यावर निर्बंध आणले जातील. त्यांनी कॅबिनेटच्या निर्णयाचा हवाला देत सांगितले की, यापुढे कोणत्याही अल्पवयीनच्या लग्नाची नोंद केली जाणार नाही. सरमा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, सरकार आगामी सत्रात आसाम मुस्लीम निकाह अनिवार्य नोंदणी आणि घटस्फोट विधेयक, २०२४ सादर करणार आहे. आसाम मंत्रिमंडळाने बुधवारी एका प्रस्तावित कायद्याला मंजुरी दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest