Vijaypat Singhania : ‘मला रस्त्यावर आणून त्याला खूप आनंद झाला’मुलाच्या नावे सगळं करुन केली चूक; विजयपत सिंघानिया यांची खंत

रेमंड (Raymond) ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया (Gautam Singhania) हे पत्नी नवाज मोदी यांना दिलेल्या घटस्फोटामुळे (Divorce) चर्चेत असून याबाबतच्या वादात गौतम यांचे वडील आणि रेमंडचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांची एंट्री झाली आहे.

‘मला रस्त्यावर आणून त्याला खूप आनंद झाला’मुलाच्या नावे सगळं करुन केली चूक; विजयपत सिंघानिया यांची खंत

मुंबई : रेमंड (Raymond) ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया (Gautam Singhania) हे पत्नी नवाज मोदी यांना दिलेल्या घटस्फोटामुळे  (Divorce) चर्चेत असून याबाबतच्या वादात  गौतम यांचे वडील आणि रेमंडचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांची एंट्री झाली आहे. त्यांनी मुलगा गौतमवर कडाडून टीका करताना मला रस्त्यावर आणून त्याला खूप आनंद झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांनी आपल्याला मारहाण केल्याच वक्तव्य केलं होतं.

एका मुलाखतीत या वादावर विजयपत सिंघानिया म्हणतात की, मला रस्त्यावर आणून गौतमला आनंद झाला. २०१५ मध्ये मी रेमंडची जबाबदारी त्याला दिली. मात्र, मी सगळं त्याच्या नावे करायला नको होतं. तो माझा मूर्खपणा होता. जे आई वडील आपल्या मुलांना सगळं काही देतात, आपली सगळी संपत्ती, मालमत्ता त्यांच्या नावे करतात, त्यांनी आधी चारदा विचार केला पाहिजे. मला माझ्या मुलाने घरातून हाकलून दिलं. मी रस्त्यावर आलो ते पाहून त्याला आनंद झाला. नंतर त्याने सांगितलं की कंपनीचा काही भाग तो माझ्या नावे करणार आहे. मात्र ते आश्वासनही हवेत विरले. मी त्याला सगळे अधिकार देऊन चूक केली. 

१३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी नवाज आणि मी वेगळे होत असल्याची घोषणा गौतम सिंघानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केली होती. त्याचवेळी नवाज मोदी यांना रेमंड हाऊसच्या दिवाळी पार्टीत येऊ दिले नसल्याचा व्हीडीओही व्हायरल झाला होता. नवाज मोदी यांनी घटस्फोटाच्या बदल्यात तडजोड म्हणून गौतम यांच्या संपत्तीचा ७५ टक्के भाग मागितला आहे. त्याबाबत विजयपत सिंघानिया म्हणाले, हिंदू विवाह कायद्यानुसार जर पती पत्नी विभक्त झाले तर पत्नीचा पतीच्या ५० टक्के संपत्तीवर हक्क असतो. नवाजला जर ५० टक्के संपत्ती हवी असेल तर तिला कोर्टात जाण्याची गरज नाही. मात्र गौतम सहजासहजी तिच्या अटी मान्य करणार नाही. प्रत्येकाला विकत घ्यायचं हाच त्याचा आदर्श आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest