हरिभाऊ बागडे बनले राजस्थानचे राज्यपाल

मोदी ३.० मध्ये प्रथमच १० राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आणि प्रशासक बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनाने शनिवारी (२७ जुलै) रात्री उशिरा ६ नवीन राज्यपालांच्या नावांची घोषणा केली तर तिघांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 29 Jul 2024
  • 11:06 am
Political News, governors, union territory, governors and administrators, Modi 3.0, bjp

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने बदलले ६ राज्यपाल, तिघांची केली बदली

नवी दिल्ली: मोदी ३.० मध्ये प्रथमच १० राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आणि प्रशासक बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनाने शनिवारी (२७ जुलै) रात्री उशिरा ६ नवीन राज्यपालांच्या नावांची घोषणा केली तर तिघांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे पंजाबच्या राज्यपालांसोबतच चंदीगडचे प्रशासक म्हणूनही पदभार स्वीकारतील, तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, हरिभाऊ बागडे हे राजस्थान, माजी केंद्रीय मंत्री आणि ८ वेळा खासदार संतोष गंगवार झारखंडचे, माजी खासदार रमण डेका यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

कलराज मिश्रा (राजस्थान), विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), रमेश बैस (महाराष्ट्र), बनवारीलाल पुरोहित (पंजाब-चंदीगड), अनुसुया उईके (मणिपूर) आणि फगू चौहान (मेघालय) यांना हटवण्यात आले आहे. सी. पी. राधाकृष्णन (झारखंडहून महाराष्ट्र), गुलाबचंद कटारिया (आसामहून पंजाब-चंदीगड), लक्ष्मण आचार्य (सिक्कीमहून आसाम, मणिपूर) या तीन राज्यपालांना इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. या वर्षी महाराष्ट्र-झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, जिथे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. याशिवाय हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

हरिभाऊ किसनराव बागडे, राजस्थान
हरिभाऊ किसनराव बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा कुटुंबात झाला. त्यांचे फक्त दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. वयाच्या १३ व्या वर्षी आरएसएसमध्ये प्रवेश केला. १९८५ मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ते कॅबिनेट मंत्री आणि विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest