संग्रहित छायाचित्र
गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भावात (Gold-silver rates) सुरू असलेली घसरण कायम आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव बुधवारी ५६ हजारांच्या जवळ होता. चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत असून चांदीचा भाव ६७ हजारांच्या घरात होता. पुण्यात सोन्याचा भाव ५७ हजार ३७० असा होता तर चादींचा भाव ७० हजार ७०० असा होता.
याशिवाय जागतिक बाजारातील घसरणीमुळे सोन्याचा भाव ७ महिन्यांतील नीच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. सोन्या-चांदीच्या भावात सतत घसरण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. भविष्यात सोने आणखी स्वस्त होऊ शकते.
बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज एमसीएक्सवर सोने ०. १८ टक्क्यांनी घसरून ५८ हजार ८२७ रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. याशिवाय चांदी ०.५२ टक्क्यांनी घसरून ६७ हजार ०४२ रुपये प्रति किलोवर होते.
जागतिक बाजारातही सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव प्रति औंस १८१५ डॉलरच्या खाली पोहोचली आहे. कॉमेक्सवर चांदीचा भाव २१.१९ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेटवर ९९९ तर २३ कॅरेटवर ९५८ आणि २२ कॅरेटवर ९१६ अशी शुद्धता असल्याचे लिहलले असते.
बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते. काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात. सोने २४ कॅरेटमध्ये जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने अधिक शुद्ध म्हटले जाते. सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याला सरकारी हमी असते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्क ठरवते.