जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी शेतकरी गडबडा लोळला

प्रशासकीय अधिकारी हल्ली लोकप्रतिनिधींपेक्षा शिरजोर झाल्याचे दिसून येते. एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला भेटण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र जिल्हाधिकारी त्याला भेटच देत नसल्याने त्याने एक अजब मार्ग निवडला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 19 Jul 2024
  • 04:22 pm
National News, administrative officers ,meet the Collector, farmer

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी शेतकरी गडबडा लोळला

शेतकऱ्याला भेटायला प्रशासनाकडे नाही वेळ, माफियाने हडपली जमीन    

मंदसौर: प्रशासकीय अधिकारी हल्ली लोकप्रतिनिधींपेक्षा शिरजोर झाल्याचे दिसून येते. एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला भेटण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र जिल्हाधिकारी त्याला भेटच देत नसल्याने त्याने एक अजब मार्ग निवडला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काहींनी याला देशातील शेतकऱ्यांविषयीची प्रशासनाची टोकाची असंवेदनशीलता म्हटले आहे, काहींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केले जाणारे दुर्लक्ष म्हटले आहे. तर काहींनी आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रशासनाला लक्ष द्यायला भाग पाडणारी शेतकऱ्याची ही अजब कृती कौतुकास्पद ठरली आहे. कारण मंदसौर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी एक शेतकरी अचानक जमिनीवर झोपला आणि गडाबडा लोळत रडू लागला!

शंकरलाल पाटीदार हे मंदसौर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गडबडा लोळत असल्याचे व्हीडीओत दिसत आहे. या संदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. शेतकरी शंकरलाल पाटीदार यांची अशी तक्रार होती की, एक माफिया त्यांच्या शेतजमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आपली शेतजमीन जर या माफियाने बळकावली, तर आपण आणि आपल्या शेतकरी कुटुंबाने काय करायचे?  असा त्यांचा अत्यंत मूलभूत असा प्रश्न होता. पण प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार तक्रार करूनदेखील शंकरलाल यांच्या हाती काही यश लागले नाही.

अनेकदा या सर्व प्रकरणासंदर्भात तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर शंकरलाल पाटीदार हतबल झाले. त्यांनी थेट मंदसौरचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच जाब विचारावा, या हेतूने ते निघाले. पण त्यांना बराच वेळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटूच न दिल्यामुळे त्यांचा उद्वेग वाढला. दरम्यान, कुणीच आपल्या तक्रारीची दखल घेत नाही हे पाहून शेवटी शंकरलाल थेट कार्यालयाच्या व्हरांड्यातील जमिनीवरच झोपले आणि गडाबडा लोळत गोल गोल फिरत ओरडू लागले. 'आमचे कुणीही ऐकत नाही, आता आम्ही काय करायचे असा प्रश्न ते वारंवार रडत विचारू लागले. आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना काय घडत आहे हे लक्षात येईपर्यंत शंकरलाल किमान १० ते १५ फूट असेच ओरडत, गोल गोल फिरत पोहोचले होते. शेवटी त्यांना कर्मचाऱ्यांनी हात देऊन उठवून उभे केले.

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने त्यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या जमिनीबाबत शंकरलाल यांना माफियाची भीती वाटत होती, ती जमीन त्यांच्याच नावे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र एक माफिया जमीन बळकावण्यासाठी प्रयत्न करत असून तक्रार करूनही दखल न घेतल्याने आपल्याला हा मार्ग पत्करावा लागल्याचे पाटीदार म्हणाले आहेत. 

मोदी शेतकरीविरोधीच !
दरम्यान, हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली. अधिकृत एक्स हँडलवर काँग्रेसने हा व्हीडीओ शेअर करून सरकारवर टीका केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest