संग्रहित छायाचित्र
देशाचे दोन वेळा पंतप्रधानपद भूषविणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपुर्ण देश हळहळला. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच उद्या अंत्यसंस्कार सांगण्यात येत आहेकेले जातील. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज केला जाईल असे.
मनमोहन सिंग यांचा जन्म 1932 मध्ये अविभाजित भारतात झाला. आज ज्या भागात त्यांचा जन्म झाला तो भाग पाकिस्तानातील पंजाबमध्ये येतो. मनमोहन सिंग यांना भारतातील आर्थिक सुधारणांचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून घेतले. याठिकाणी त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले, तिथे त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवीही मिळवली.
मनमोहन सिंग यांची राजकीय कारकिर्द
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले होते. मनमोहन सिंह 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले होते.
1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. ते अर्थ मंत्रालयाचे सचिव तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मनमोहन सिंह 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. 2004 साली भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. ते सलग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.