संग्रहित छायाचित्र
संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अशातच एक धक्कादायक घटना संसदेजवळ घडली आहे. एका तरुणाने संसदेजवळ स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तो व्यक्ति गंभीररित्या भाजली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीमधील रेल्वे भवन येथे एका तरुणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. त्यांनंतर तो तरुण आगीच्या ज्वाळांमध्ये संसदेच्या दिशेने धावत सुटला. पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले. त्याला लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांनी केले. दरम्यान, या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
स्वत:ला पेटवून घेणारा हा तरुण उत्तरप्रदेशातील बागपत येथील जितेंद्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्याची ओळख अजूनही स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. संसदेजवळील हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय अतिशय संवेदनशील आहे. या परिसरात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान, या तरुणाने हे पाऊल का उचलले त्याच्या कारण अजून स्पष्ट झाले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.