भारतात कंडोमशिवाय सेक्स करण्याचा ट्रेंड; सर्वात कमी 'या' राज्यात होतो वापर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात भारतात कंडोमशिवाय सेक्स करण्याचा ट्रेंड वाढत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय कोणत्या राज्यांमध्ये कंडोमचा वापर जास्त केला जातो? याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शारीरिक संबंधांदरम्यान कंडोमचा वापर पूर्वीच्या तुलनेत आता कमी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Sep 2024
  • 04:42 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता, व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन

नवी दिल्ली: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात भारतात कंडोमशिवाय सेक्स करण्याचा ट्रेंड वाढत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय कोणत्या राज्यांमध्ये कंडोमचा वापर जास्त केला जातो? याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शारीरिक संबंधांदरम्यान कंडोमचा वापर पूर्वीच्या तुलनेत आता कमी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कंडोमच्या वापराबाबत आरोग्य विभाग सातत्याने लोकांना जागरूक करत आहे. पण कंडोमबद्दल सार्वजनिक बोलणे लाजीरवाणे वाटत असल्याने लोक अधिक गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या वाढत आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील जोडपी कंडोमचा सर्वाधिक वापर करतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इथे लैंगिक संबंधांबाबत अधिक जागरूकता आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाने एक सर्वेक्षण केले होते.  या सर्वेक्षणात दादरा नगर हवेलीत १० हजार जोडप्यांपैकी ९९३ जोडपी शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करतात असे समोर आले आहे. देशातील अनेक राज्यात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचा नंबर लागतो. आंध्रात १० हजार जोडप्यांपैकी ९७८ जोडपी कंडोमचा वापर करतात, तर कंडोमचा सर्वात कमी वापर कर्नाटकमध्ये होतो. इथे १० हजार जोडप्यांपैकी केवळ ३०६ जोडपी शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करतात. वृत्तसंंस्था

६ टक्के लोकांना कंडोमबद्दल माहितीच नाही

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात भारतातील सहा टक्के लोकांना कंडोमबद्दल माहिती नसल्याचे समोर आले आहे. भारतात दरवर्षी जवळपास ३३.७ कोटी कंडोमची विक्री होते. उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी ५.३ कोटी कंडोमची विक्री होते. इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी रुग्णालयात कंडोमची मोफत विक्री केली जाते, पण अहवालानुसार गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशमध्येही कंडोमचा वापर घटला आहे. पुद्दुचेरीत १० हजार जोडप्यांपैकी ९६०, पंजाबमध्ये ८९५, चंदीगडमध्ये ८२२, हरियाणात ६८५, हिमाचल प्रदेशमध्ये ५६७, राजस्थानमध्ये ५१४ आणि गुजरातमध्ये ४३० जोडपी शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात समोर आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest