हिमाचलमध्ये अश्लील चॅटिंगप्रकरणी भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

हिमाचलमधील चुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हंसराज यांच्यावर भाजपच्याच बूथ अध्यक्षांच्या मुलीने अश्लील चॅट केल्याचा आरोप केला आहे. मुलीचे म्हणणे आहे की, जेव्हा ती सहमत नव्हती तेव्हा आमदाराने तिला धमकावले. तिच्या जीवाला धोका आहे. चंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर महिला पोलिस ठाण्यात आमदार हंसराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 20 Aug 2024
  • 04:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भाजपच्याच बूथ अध्यक्षाच्या मुलीला नग्न फोटो मागितल्याचा धक्कादायक प्रकार

चंबा: हिमाचलमधील चुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हंसराज यांच्यावर भाजपच्याच बूथ अध्यक्षांच्या मुलीने अश्लील चॅट केल्याचा आरोप केला आहे. मुलीचे म्हणणे आहे की, जेव्हा ती सहमत नव्हती तेव्हा आमदाराने तिला धमकावले. तिच्या जीवाला धोका आहे. चंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर महिला पोलिस ठाण्यात आमदार हंसराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ‘‘आमदाराने अश्लील चॅट केली आणि माझ्याकडून न्यूड फोटो मागितले. मी आमदारांना कामे करण्यास सांगितले होते. त्यावर आमदार म्हणाले की, मला भेटून मी सांगेन ते करावे लागेल. त्यांच्यासोबत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मला चॅट डिलीट करण्याची धमकी दिली.’’

गेल्या वर्षी आमदार हंसराज यांच्यावर मुख्याध्यापक आणि काँग्रेस नेते यशवंत खन्ना यांना धमकावल्याचा आरोप झाला होता. शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय हिमगिरी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी हंसराज यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी काँग्रेस नेते यशवंत खन्ना यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रत्येकी दोन नेते शाळेत पोहोचले. नंतर हंसराज यांना परतावे लागले. यानंतर आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी शाळेत घुसून गोंधळ घातला.

 २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चंबा येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर नड्डा यांचा ताफा विश्रामगृहाकडे निघाला होता. तत्कालीन उपसभापती हंसराज यांची गाडीही याच ताफ्यात होती. त्याचवेळी डीसीने हंसराज यांच्या गाडीला ओव्हरटेक केले आणि त्यांची कार नड्डा यांच्या कारच्या मागे लावली. यानंतर हंसराज यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली होती.

आमदार फरार झाल्याचा संशय

मी गप्प राहिले तर गरिबांचेही असेच होईल. तुम्ही जेव्हाही आमदाराकडे कामानिमित्त जाल तेव्हा आधी तुम्हाला त्यांचे ऐकावे लागेल, असे ते सांगतात, असा आरोपही पीडित मुलीने केला आहे. यासंदर्भात आमदारांची बाजू जाणून घेण्यासाठी फोन केला असता, त्यांचा मोबाईल बंद आढळून आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते भूमिगत झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी फोन तोडल्याचा आरोप

पीडित मुलगी म्हणाली की, ‘‘नेतेमंडळी म्हणतात बेटी वाचवा, बेटी पढाओ, तर दुसरीकडे मुलीला त्रास देतात. भविष्यात मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील. आमदाराने माझ्याशी अश्लील चॅट केली. मी त्यांच्या मुलीच्या वयाची आहे. माझ्याकडे दोन फोन आहेत. पुरावे नष्ट व्हावेत म्हणून त्यांनी माझा फोनही तोडला आहे. चॅट हटवण्यासाठी ते काहीही करू शकतात.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest