संग्रहित छायाचित्र
भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) दहा आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या आमदारांच्याविरोधात बीआरएस आक्रमक झाला असून मंगळवारी (१६ जून) तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष जी. प्रसाद कुमार यांच्याकडे काँग्रेसमध्ये सामील झालेल्या १० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. बीआरएसचे कार्याध्यक्ष के.टी रामाराव आणि इतर आमदारांनी विधानसभेत सभापतींना निवेदन दिले.
रामाराव म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी या याचिकेवर लक्ष घालून कायदा आणि संविधानातील तरतुदींनुसार निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. के. टी. रामाराव म्हणाले की, आमचा अजूनही विधानसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. ते विवेकाला स्मरून निर्णय घेतील, अशी आशा आहे.
जर त्यांनी तसे केले नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाच्या रक्षणाचे मोठे दावे करतात. पण पक्ष बदललेल्या आमदारांच्या पाठीवर थाप मारताना दिसत असल्याची टीकाही रामाराव यांनी केली आहे.