सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया
आध्यात्मिक गुरू आणि इषा फाऊंडेशन या संस्थेचे प्रमुख सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. तातडीने करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. सद्गुरू (Sadguru Jaggi Vasudev) यांना मागील काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता.
सद्गुरू १७ मार्च रोजी दिल्लीमधील आपोलो रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर डॉ. विनीत सुरी यांनी शस्त्रक्रिया केली. एमआयआर व अन्य तपासणीमध्ये सद्गुरू यांच्या मेंदूला सूज आल्याचं तसेच, रक्तस्त्राव झाल्याचं निदान करण्यात आलं होत.
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सद्गुरू यांनी एका व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘अपोलो रुग्णालयात माझ्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या मेंदूमध्ये डॉक्टरांना गाठ किंवा तत्सम काही आढळून आलेलं नाही. माझ्या मेंदूला कुठलीही इजा झालेली नसल्याचे तयांनी हसत हसतच सांगितले.