संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: आधारकार्ड भारतातील नागरिकांसाठी महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे. हे आधारकार्ड अनेक सरकारी योजनासाठी देखील आवश्यक बनले आहे. परंतू एका महिलेला नकली आधारकार्ड बनविल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कोर्टात खटला उभा राहीला. अखेर सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयाने या ६३ वर्षीय बांग्लादेशी महिलेला १४ महिन्यांच्या तुरुंगावासाची सजा सुनावली आहे.
भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी एका बांग्लादेशी महिलेने बोगस आधारकार्ड बनवले होते. या महिलेला पोलिसांना अटक केली आहे. या महिलेवर खटला उभारण्यात आला, त्यानंतर सुरतच्या न्यायालयाने आरोपी मल्लिका साकिन हिला १४ महिन्यांच्या सक्तमजुरीची सजा सुनावली आहे.
ही महिला बांग्लादेशातील गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती २०२० रोजी सुरत येथे रहायला आली. ती सुरत मध्ये सरदार सलाबतपुराच्या मंदरवाजा टेनेमेंट येथे राहत होती. पोलिसांनी अटक केली तेव्हा तिच्या जवळ एक बांग्लादेशाचा पासपोर्ट होता. हा पासपोर्ट २८ सप्टेंबर २०२२ रोजी १० वर्षांसाठी जारी केला होता. तिच्याकडून बांग्लादेशी पासपोर्ट, आधार कार्ड आणि कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्रासह अन्य साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२२ पासून १९ ऑक्टोबर २०२३ पर्यंतचा अधिकृत बांग्लादेशी व्हीसाही सापडला आहे. या महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५ ( फसवणूक ), ४७० ( बनावट दस्ताऐवज बनवणे ), ४७१ ( बोगस कागदपत्रांना खरे म्हणून सादर करणे ), ४६७ ( सुरक्षेसाठी खोटी कागदपत्रे तयार करणे ) आणि ४६८ (फसवणूकीसाठी खोटी कागदपत्र तयार करणे ) या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही महिला सुरतमध्ये एकटी रहात होती, सध्या तिला सूरत सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.