संग्रहित छायाचित्र
दिल्ली :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवार (दिं.१०) रोजी सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा मिळाला असून तिहार जेलमधून ते बाहेर येणार आहेत. (Delhi Excise Policy Case )
मुख्यमंत्री रविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी अशा मागणीची याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.दरम्यान केजरीवाल यांच्या याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी पार पडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना मोकळीक दिल्यामुळे आपला मोठा दिलासा मिळाला आहे.
Delhi excise policy case: Supreme Court says it’s passing order on grant of interim bail to Delhi CM Arvind Kejriwal till June 1. pic.twitter.com/lyOLH8qGF1
— ANI (@ANI) May 10, 2024
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निकाल दिला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहे. अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण कराव लागेल.