लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न

पुणे : देशाचे माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारत सरकारने भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करीत ही माहिती दिली.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत दिली माहिती

पुणे : देशाचे माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारत सरकारने भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करीत ही माहिती दिली.

राम मंदिर आंदोलनाच्या (Ram Mandir Andolan) पार्श्वभूमीवर आडवाणी यांनी दिलेलं योगदान त्यांचं कार्य याचा परिणाम म्हणून भारतरत्न पुरस्काराकडे पाहिले जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यांना पक्षाने बाजूला ठेवल्याची, राम मंदिराच्या उद्घाटना वेळी देखील त्यांना चुकीची वागणूक दिल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर  त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन विरोधकांना एक प्रकारे उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

आडवाणी यांची कारकीर्द आक्रमक अशी राहिलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची मैत्री जगविख्यात होती. आडवाणी यांनी वाजपेयी यांच्या खांद्याला खांदा देऊन अनेक वर्ष काम केले. या दोघांच्या जोडीने खऱ्या अर्थाने देशामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवला रुजवला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest