बंगळुरू : पत्नीने पतीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली, कारण हास्यास्पद

पती-पत्नीमध्ये भांडणे होणे ही एक सामान्य घटना आहे. परंतु काही वेळा ही भांडणे एवढ्या गंभीर वळणावर पोहोचतात की, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन तक्रार दिली जाते तर कधी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला जातो.

Spousal Disputes, Police Complaint, Court Case, Bengaluru Incident, Karnataka High Court, Ridiculous Reason, Husband-Wife Dispute, Unique Case, Hilarious Court Case

पत्नीने नोंदवला नवऱ्याविरुद्ध कौटुंबिक अत्याचार केल्याचा गुन्हा

#बंगळुरू

पती-पत्नीमध्ये भांडणे होणे ही एक सामान्य घटना आहे. परंतु काही वेळा ही भांडणे एवढ्या गंभीर वळणावर पोहोचतात की, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन तक्रार दिली जाते तर कधी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला जातो. 

मात्र, कर्नाटकातील बंगळुरू येथे एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका क्षुल्लक व हास्यास्पद कारणावरून पत्नीने आपल्या पतीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीचे न्यायालयात जाण्याचे कारण हास्यास्पदच आहे.  सध्या ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी पत्नीच्या या कृतीवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्याने न्यायमूर्तींनाही हसू आवरता आले नाही. एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिला फ्रेंच फ्राईज खायला मनाई केली आहे. तिच्या पतीने तिला गरोदरपणात पौष्टिक आहार म्हणून फ्रेंच फ्राईज न खाण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे तिला राग आला आणि तिने थेट पतीविरोधात गुन्हा दाखल केला.

महिलेचा दावा आहे की तिच्या पतीने तिला बांगलादेशातील बटाट्यापासून बनवलेले फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखले. त्यामुळे तिने थेट पोलीस स्टेशन गाठत पतीविरोधात तक्रार दिली. हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातही पोहोचले, जिथे पतीने पत्नीने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले. प्रकरण रद्द करण्याची मागणी केली.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवणे योग्य नाही. जर पती पत्नीच्या आरोग्याची काळजी घेऊन तिला काही खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखत असेल तर त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे.

न्यायालयाने महिलेच्या पतीच्या बाजूने निकाल दिला आणि पत्नीने केलेले सर्व आरोप रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. एवढ्या क्षुल्लक कारणावरून पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावणे योग्य नाही, असेही न्यायमूर्ती नागप्रसन्ना म्हणाले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest