'बटेंगे तो हमी भी कटेंगे', बांगलादेशचे उदाहरण देत योगी आदित्यनाथांनी दिला इशारा; छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत ऐक्य वाढवण्याचे आवाहन

आग्रा: बांगलादेशमधील लोकांनी ज्या चुका केल्या, त्या चुका आपल्या हातून इथे (भारतात) व्हायला नकोत. आपण एकसंध राहिलो तर सुरक्षित राहू शकतो. आपण विभागले गेलो तर आपण सगळेच कापले जाऊ. जात, धर्म, पंथ या आधारे आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून सुरू आहेत, त्याला आपण बळी पडता कामा नये, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू एकतेचे महत्त्व सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 27 Aug 2024
  • 02:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आग्रा: बांगलादेशमधील लोकांनी ज्या चुका केल्या, त्या चुका आपल्या हातून इथे (भारतात) व्हायला नकोत. आपण एकसंध राहिलो तर सुरक्षित राहू शकतो. आपण विभागले गेलो तर आपण सगळेच कापले जाऊ. जात, धर्म, पंथ या आधारे आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून सुरू आहेत, त्याला आपण बळी पडता कामा नये, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू एकतेचे महत्त्व सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा शहरात उभारण्यात आलेल्या वीर दुर्गादास राठोड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज (२६ ऑगस्ट) लोकार्पण केले.  यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना आदित्यनाथ बोलत होते. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पनेसाठी कार्य करायचे आहे. मी दुर्गादास राठोड यांना कोटी कोटी नमन करतो आणि सर्वांना एकतेचा संदेश देतो. राष्ट्राप्रती समर्पण आणि खरी श्रद्धा कशी असावी याचे उदाहरण म्हणजे दुर्गादास राठोड. त्यांनी त्यांचे शौर्य व पराक्रमातून दाखवून दिले की राष्ट्राहून अधिक महत्त्वाचे काहीच नसते. तोच भाव आपल्या मनात सदैव राहिला पाहिजे. आपल्यासाठी राष्ट्र प्रथम असले पाहिजे. राष्ट्रापेक्षा मोठे काही असूच शकत नाही. आपण एकजुटीने राहू, चांगले आचरण करू तेव्हाच आपले राष्ट्र मजबूत होईल. तुम्ही विभागले गेलात, तर कापले जाल. एकत्र राहिलात तर सुरक्षित राहाल. बांगलादेशमधील परिस्थिती तुम्ही पाहात आहातच. त्यातून आपण शिकायला हवे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुघल बादशाह औरंगजेबाचा दुष्ट असा उल्लेख केला. ते म्हणाले, औरंगजेबही या आग्र्याशी संबंधित होता. याच आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला आव्हान दिलं होतं. महाराज त्याला म्हणाले होते, ‘तू उंदरासारखा तडफडत राहशील. आम्ही तुला भारत काबीज करू देणार नाही’. त्याच काळात जोधपूरचे राजे जसवंत सिंह हे देखील मातृभूमीसाठी लढत होते. वीर दुर्गादास राठोड हे जसवंत सिंह यांच्या सैन्याचे सेनापती होते. औरंगजेबाने अनेकदा जोधपूरवर हल्ला केला. जोधपूर काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु, प्रत्येक वेळी त्याला अपयश आले.  कारण, जिथे दुर्गादास यांच्यासारखे वीर उभे होते, तिथे औरंगजेबाला यश मिळणे अशक्य होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच संकल्पांचा उल्लेख केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest