संग्रहित छायाचित्र
सप्टेंबर महिना नुकताच संपत आला आहे. उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ३१ दिवसांपैकी तब्बाल १६ दिवस बँका बंद राहणार आहेत. या १६ दिवसांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याशिवाय विविध सणांच्या दिवशी विविध राज्यांमध्ये बँकां बंद राहणार आहेत. या दिवसांमध्ये तुम्हाला जर काही बँकेची कामं करायची असतील, तर घराबाहेर पडण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातल्या बँकेच्या सुट्ट्यांची माहिती मात्र नक्कीच घ्या.
रिझर्व बँकेने ऑक्टोबर महिन्यातल्या बँक हॉलिडेची यादी जाहीर केली आहे. यानुसार, ऑक्टोबरमध्ये १६ दिवस बँकेचं कामकाज बंद राहणार आहे. पहिल्याच दिवशी १ ऑक्टोबरला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. याशिवाय ८, १५, २२ आणि २९ ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील. याशिवाय १४ आणि २८ ऑक्टोबरला दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँक बंद राहतील.
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात महालय, काटि बिहू, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद असणार आहेत.
या दिवशी बंद असणार बँक
२ ऑक्टोबर (सोमवार) – गांधी जयंती – राष्ट्रीय सुट्टी
१४ ऑक्टोबर (शनिवार) – महालय- कोलकातामध्ये बँका बंद
१८ ऑक्टोबर: (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद.
२१ ऑक्टोबर शनिवार - दुर्गा पूजा (महा सप्तमी) - त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद.
२३ ऑक्टोबर (सोमवार) – दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, झारखंड, बिहारमध्ये बँका बंद आहेत.
२४ ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा/दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद.
२५ ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद.
२६ ऑक्टोबर (गुरुवार) - दुर्गा पूजा (दसैन) सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद.
२७ ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.
२८ ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद .
३१ ऑक्टोबर (मंगळवार)- सरदार वल्लभ भाई पटेल जयंती
बँकांच्या ऑनलाइन सेवा राहतील सुरू
ऑक्टोबर महिन्यातील १६ दिवस बँकांना सुट्ट्या असल्या तरी बँकांच्या ऑनलाइन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे ऑनलाइन सेवा वापरून तुम्ही तुमची बॅंकेची कामे घरबसल्या करू शकता.