संग्रहित छायाचित्र
जर तुम्हाला बँकेत काही महत्वाचे काम असेल तर ते आत्ताच करून घ्या. कारण ऑक्टोबरमध्ये तुमचं काम होईलच याची शाश्वती नाही. याचं कारण म्हणजे ऑक्टोबर हा सुट्ट्यांचा महिना असणार आहे. अगदी नवरात्री, दसरा, दिवाळी, दुर्गापूजा, गांधी जयंती अशा वेगवेगळ्या दिवशी देशभरात बँकाना सुट्टी असणार आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक सुरू असल्याने तिथेही ऑक्टोबरमध्ये एक दिवस बँक बंद असणार आहे.
बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. बँक बंद पडल्यामुळे अशी अनेक कामे रखडली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक महिना सुरू होण्यापूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. RBI च्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये बँकांमध्ये 31 पैकी 15 दिवस सुट्ट्या असतील. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त विविध सणांच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये बँकेला सुट्ट्या कधी असतील?
1 ऑक्टोबर - विधानसभा निवडणुक (जम्मूमध्ये बँका बंद).
2 ऑक्टोबर - गांधी जयंती.
3 ऑक्टोबर - शारदीय नवरात्री/ महाराजा अग्रसेन जयंती (जयपूरमध्ये बँकांना सुट्टी).
6 ऑक्टोबर - रविवार.
10 ऑक्टोबर - दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमी (अगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता येथील बँका बंद)
11 ऑक्टोबर - दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमी (अगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इंफाळ, शिलाँग, कोलकाता, पाटणा, रांची येथील बँकांना सुट्टी)
12 ऑक्टोबर - दसरा, विजयादशमी, दुर्गापूजा (देशभरातील बँकांना सुट्टी).
13 ऑक्टोबर - रविवार.
14 ऑक्टोबर - दुर्गा पूजा / दसेनच्या (गंगटोकमध्ये बँकांना सुट्टी).
16 ऑक्टोबर - लक्ष्मीपूजन (अगरतळा, कोलकाता मध्ये बँकांना सुट्टी).
17 ऑक्टोबर - महर्षि वाल्मिकी आणि कांति बिहू (बेंगळुरू आणि गुवाहाटी येथील बँकांना सुट्टी).
20 ऑक्टोबर - रविवार.
26 ऑक्टोबर - चौथा शनिवार.
27 ऑक्टोबर - रविवार.
31 ऑक्टोबर - दिवाळी (देशभरातील बँकांना सुट्टी).