संग्रहित छायाचित्र
पुणे: २२ जानेवारी रोजी अयोध्येत (Ayodhya) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. आयोध्येत स्थापित केली जाणारी रामलल्लाची मूर्ती (Ramalalla) अंतिम करण्यात आली आहे. ही प्राणप्रतिष्ठापणेसाठी निवडण्यात आलेली मूर्ती कर्नाटकच्या म्हैसूर मधील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून तीन मूर्तीकारांची निवड करण्यात आली होती. अरुण योगीराज (Arun Yogiraj) ही त्यांपैकी एक होते. तीन मूर्तीकरांमधून निवड झाल्यानंतर अरुण योगीराज यांनी आनंद व्यक्त केला होता. रामलल्लाची मूर्ती घडवणारे ३७ वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटक मधील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहे.
अरुण योगीराज ही कर्नाटक मधील म्हैसूर येथे वास्तव्यास आहेत. २००८ साली अरुण योगीराज यांनी म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यांतर काही काळ एका खाजगी ठिकाणी नोकरी करून त्यांनी मूर्तीकला जोपासण्याचे ठरवले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची दिल्लीतील इंडिया गेट येथे बसवण्यात आलेली ३० फुट उंचीची मूर्ती अरुण योगीराज यांनीच बनवली होती. सोबतच नेताजींची २ फुट उंच मूर्ती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली होती. त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले होते.
त्यांच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध मूर्तिकार होऊन गेले. त्यांनी साकारलेल्या मूर्तींना विविध राज्यांतून मागणी आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कौशल्याच आणि प्रतिभेचं कौतुक केलं होतं. अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथील आदि शंकराचार्य यांची १२ फुट उंचीची मूर्ती बनवली होती. तसेच म्हैसूर मधील चुंचनकट्टे येथील हनुमानाची २१ फुट मूर्तीही त्यांनी घडवल्या आहेत.