योग्य पोषाखातच न्यायालयात हजर राहा, जीन्स घालून आलेल्या वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

नवी दिल्ली: वकिलांनी योग्य पोशाखातच न्यायालयात आले पाहिजे असे ठणकावत सर्वोच्च न्यायालयाने जीन्स घालून आलेल्या वकिलाला खडे बोल सुनावले आहेत. एका वकिलाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. गुवाहाटी न्यायालयाने जीन्स घालून आलेल्या वकिलाला निलंबित केले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 12 Jul 2024
  • 03:26 pm
Supreme Court of India, lawyer wore jeans, proper attire in court

संग्रहित छायाचित्र

उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: वकिलांनी योग्य पोशाखातच न्यायालयात आले पाहिजे असे ठणकावत सर्वोच्च न्यायालयाने जीन्स घालून आलेल्या वकिलाला खडे बोल सुनावले आहेत. एका वकिलाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. गुवाहाटी न्यायालयाने जीन्स घालून आलेल्या वकिलाला निलंबित केले होते. त्या निर्णयाविरोधात या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेही वकिलाला सुनावले आहे.

गुवाहाटी न्यायालयाने पोलिसांना सांगून जीन्स घालून आलेल्या वकिलाला बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाने असा निर्णय कसा घेतला? मला पोलिसांकरवी बाहेर का काढले ? असे सवाल करत याचिका दाखल केली होती. वकिलाचे म्हणणे हे होते की मी जीन्स घालून आल्याबद्दल माफी मागितली होती. तसेच न्यायालयाने मला जायला सांगितले असते तरीही मी गेलो असतो. पोलिसांकरवी मला बाहेर का काढण्यात आले? मात्र न्यायालयाने वकिलांनी योग्य पोशाखांमध्ये आले पाहिजे असे म्हटले आहे. तसेच या याचिकेतील पोलिसांना बोलावून वकिलाला बाहेर काढले तो उल्लेख काढला आहे. गुवाहाटीच्या उच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी स्थगित केली होती. कारण एक वरिष्ठ वकील न्यायालयात जीन्स घालून आले होते. याचिकाकर्ते वकील बी. के. महाजन जीन्स घालून आले होते. याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना बोलावले आणि या वकिलांना पोलिसांकरवी बाहेर काढले. यानंतर या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयातही घडली होती अशीच घटना
काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात असे  प्रकरण समोर आले होते. वाराणसीच्या सिंचन विभागाच्या इंजिनिअर विजय कुमार कुशवाहा उच्च न्यायालयात जीन्स घालून गेले होते. त्यावेळी त्यांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. न्यायालयाने आदेशात असे म्हटले आहे बी. के. महाजन यांनी केलेले कृत्य योग्य नाही. महाजन हे सातत्याने जीन्स घालून कोर्टात येत होते, असेही निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण लक्षात आले. त्यानंतर पोलीस बोलावून त्यांना बाहेर नेण्यात आले. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest