'दुनिया में कुछ भी कर लेना, पर शादी मत करना' असा व्हिडीओ बनवून सासरच्या त्रासाला कंटाळलेल्या तरुणाची आत्महत्या

लखनौ: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डीएलएफ कॉलनीत राहणाऱ्या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'दुनिया में कुछ भी कर लेना, पर शादी मत करना' असा व्हीडीओ करत या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 12:37 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लखनौ: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डीएलएफ कॉलनीत राहणाऱ्या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'दुनिया में कुछ भी कर लेना, पर शादी मत करना' असा व्हीडीओ करत या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन व्हीडीओ रेकॉर्ड केले.

पीडित जगजीत सिंग राणा हे बुलंदशहरच्या नरसैना भागातील रहिवासी होते. ते एका फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. तसंच, औषध पुरवठ्याचा व्यवसाय करत होते. पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला ते इतका त्रासून गेले की त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये दोन व्हीडीओ रेकॉर्ड केले. सिंग यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेला आढळल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला. तपासादरम्यान पोलिसांना आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले दोन व्हीडीओ सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात जगजीतने सांगितले होते की, सासरच्या लोकांमुळे त्याला जीवाची भीती वाटत होती आणि ते त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडत होते. तीन मिनिटे चार सेकंदांच्या व्हीडीओमध्ये त्याने बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावात आपले सासरे राहत असल्याचे नमूद केले आहे. माझी पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा छळ असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे, असे जगजीतने व्हीडीओमध्ये म्हटले आहे. तो पुढे म्हणाला की त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांनी दिलेल्या यातना मी वर्णन करू शकत नाही. त्यांना माझे तोंड दाखवू नका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest