President : दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू (Droupadi Murmu) यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil)यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती आपला पदभार स्वीकारल्या नंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganapati) मूर्ती व शाल देऊन गौरविले.

President

दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !

पुणे : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू (Droupadi Murmu) यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil)यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती आपला पदभार स्वीकारल्या नंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganapati) मूर्ती व शाल देऊन गौरविले. 

याप्रसंगी अँड. प्रताप परदेशी व डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहलेल्या 'बाल रक्षण कायद्याचे (Pocso) अंतरंग' या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना प्रदान करण्यात आली. सदर भेटी दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, ज्योतीताई राठोर, जयेश राठोर, अँड प्रताप परदेशी व विनित परदेशी आदी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest