क्वालिटी टेस्टमध्ये ५३ औषधे फेल

नवी दिल्ली: पॅरासिटामॉलसह ५३ औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने यासंदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 26 Sep 2024
  • 10:52 am

संग्रहित छायाचित्र

पॅरासिटामॉलबरोबरच जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबवरील प्रतिजैविकेही अपयशी, यादीतील पाच औषधे बनावट

नवी दिल्ली: पॅरासिटामॉलसह ५३ औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने यासंदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे.

बंदी असलेल्या औषधांच्या यादीमध्ये क्लोनाझेपम टॅबलेट, वेदनाशामक डायक्लोफेनाक, श्वसन रोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या अँब्रोक्सोल, फंगलविरोधी फ्लुकोनाझोल आणि काही मल्टीविटामिन आणि कॅल्शियम गोळ्यांचा समावेश आहे.

ही औषधे हेटेरो ड्रग्स, अल्केम लेबोरेट्रीज, हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांसारख्या बड्या कंपन्या बनवतात. पोटाच्या संसर्गासाठी दिले जाणारे मेट्रोनिडाझोल हे औषध हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडने तयार केले आहे, तेही या चाचणीत अपयशी ठरले आहे. त्याचप्रमाणे टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या शेलकल गोळ्याही चाचणीत अपयशी झाल्या.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने चाचणीत अयशस्वी झालेल्या ५३ औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी पाच औषधे बनावट होती. म्हणजेच औषध उत्पादक कंपन्यांनी सांगितले की ही त्यांची औषधे नसून त्यांच्या नावाने बनावट औषधे बाजारात विकली जात आहेत.

 केंद्र सरकारने या वर्षी ऑगस्टमध्ये १५६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. ताप आणि सर्दी व्यतिरिक्त, हे सामान्यतः वेदनाशामक, मल्टी-व्हिटॅमिन आणि प्रतिजैविक म्हणून वापरले जात होते. त्यांच्या वापरामुळे मानवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे देशभरात या औषधांचे उत्पादन, सेवन आणि वितरण यावर बंदी घालण्यात येणार आहे.

औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींवरून सरकारने हा आदेश जारी केला आहे. बोर्डाने आपल्या अहवालात म्हटले आहे की या डोस कॉम्बिनेशन  औषधांमध्ये असलेल्या घटकांचे कोणतेही वैद्यकीय औचित्य नाही. काच गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ड्रग्स म्हणतात, या औषधांना कॉकटेल ड्रग्स असेही म्हणतात.

 केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, अमायलेस, प्रोटीज, ग्लुकोअमायलेज, पेक्टिनेज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, लैक्टेज, बीटा-ग्लुकोनेज, सेल्युलेज, लिपेस, ब्रोमेलेन, झायलेनेज, हेमिसेल्युलेज, माल्ट डायस्टेस, इनव्हर्टेज आणि पॅपेन यांच्या वापरामुळे मानवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

बंदी घातलेल्या औषधांच्या यादीमध्ये केसांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे, अँटीपॅरासायटिक (परजीवींच्या प्रादुर्भावात वापरल्या जाणाऱ्या), स्किनकेअर, अँटी-ॲलर्जिक इ. सरकारने सांगितले की, या औषधांच्या जागी इतर औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही.

 या वर्षी मे महिन्यात राजस्थानमध्ये मुख्यमंत्री मोफत औषध योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या १० औषधांचे नमुने फेल ठरले आहेत. राजस्थान मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने ८ कंपन्यांच्या १० औषधांच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. या औषधांमध्ये बुरशीजन्य संसर्गामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, मलेरियाच्या गंभीर रूग्णांना दिलेली इंजेक्शन, आय ड्रॉप आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यास वापरल्या जाणाऱ्या अस्थलिन या औषधाचा समावेश आहे.



शेलकॅल, ग्लिमेपिराइडदेखील नापास
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या यादीत व्हिटॅमिन सी आणि डी थ्री टॅब्लेट शेलकॅल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटिआसिड पॅन-डी, पॅरासिटामाॅल गोळ्या आयपी ५०० एमजी, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टनदेखील क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest