File Photo
देव आनंद आणि झीनत अमान यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्याने झीनत अमान यांना इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळाली. या गाण्यात झीनत चिलम ओढताना दाखवण्यात आल्या होत्या. अशा शूटसाठी स्टार्स फक्त नशेत असल्याचा अभिनय करतात, पण झीनत या गाण्यासाठी खरोखरच नशेत होत्या. खुद्द त्यांनीच याचा खुलासा केलाआहे.
झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर 'दम मारो दम' गाण्याचा एक फोटो शेअर केला आहे.न्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी या गाण्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. त्यांनी लिहिले की, ‘‘आम्ही काठमांडूमध्ये 'हरे रामा हरे कृष्णा'चे शूटिंग करत होतो. 'दम मारो दम' या गाण्यासाठी देव साहेबांनी रस्त्यावरून हिप्पींचा समूह गोळा केला होता. हिप्पीदेखील हे करण्यास खूप उत्सुक होते, कारण एक तर त्यांना नेपाळमध्ये चरससह चिलम पॅक करण्याची संधी मिळत होती. दुसरे म्हणजे, बॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठी मोफत जेवण मिळणे. शिवाय यासाठी त्यांना पैसेही मिळत होते.’’
देव आनंद यांना हा सीन पूर्णपणे खरा करायचा होता. त्यांना माझे पात्र जेनिस खरोखर मद्यधुंद दाखवायचे होते. हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हिप्पींच्या नशेत जाणे. मी त्यावेळी किशोरवयीन होते. या गाण्यासाठी मी सतत चिलमचे झुरके घेतले. अशा परिस्थितीत आमचे शूट संपेपर्यंत मी नशेत होते. हॉटेलमध्ये जाण्याची माझी स्थिती नव्हती, म्हणून टीममधील काही लोक मला एका सुंदर ठिकाणी घेऊन गेले. जिथे मला बरं वाटलं आणि मग हळूहळू मी शुद्धीवर आले, अशी आठवणदेखील झीनत यांनी सांगितली.
झीनत यांच्या आईला ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी क्रूवरील वरिष्ठसदस्यांना खूप झापले होते. ‘‘जेव्हा माझ्या आईला ही गोष्ट नंतर कळली तेव्हा ती खूप रागावली होती. त्यांनी वरिष्ठ क्रू मेंबर्सनाही खडसावले. मात्र, मी नशीबवान होते की मी तिच्या रागातून वाचले,’’ असे त्या म्हणाल्या.
'हरे रामा हरे कृष्णा' हा चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट देव आनंद यांनीच दिग्दर्शित केला होता. मुख्य अभिनेता म्हणूनही त्यांनी काम केले. हा चित्रपट त्यांच्या काळातील सर्वात हिट चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी झीनत अमान नव्हे तर अभिनेत्री जाहिदा हुसैन ही पहिली पसंती होती, असे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जाहिदांना या चित्रपटात देव आनंद यांची बहीण नव्हे तर प्रेमिका व्हायचे होते.
अमेरिकेत ६० आणि ७० च्या दशकात हिप्पी संस्कृती मोठ्या प्रमाणावर पसरली होती. या लोकांनी विविध कारणांमुळे समाजापासून दूर राहणे पसंत केले. ज्यांनी हिप्पी संस्कृतीचे पालन केले त्यांनी औद्योगिक उत्पादने वापरली नाहीत. अनेक ठिकाणी हिप्पी संस्कृतीचे पालन करणारे लोक समूहाने राहत होते. हे लोक निसर्गाच्या खूप जवळ असल्याचा दावा करत होते. तथापि, आजही वेगवेगळ्या देशांमध्ये काही प्रमाणात हिप्पी संस्कृतीचे पालन करणारे लोक आहेत. हे लोक वेळोवेळी आपले कार्यक्रम आयोजित करत असतात. ज्यामध्ये काही बाहेरच्या लोकांनाही त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळते.