इलियानाचा बॉयफ्ररेंड कोण?
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लवकरच आई होणार आहे. मात्र, विवाहाशिवाय इलियाना आई होणार आहे. अद्याप तिने आपल्या बाळाच्या वडिलांचे नाव जाहीर केलेले नाही. असे असले तरी ती गरोदरपणाच्या प्रवासाची झलक सोशल मीडियावर शेअर करत असते. इलियानाने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो धुसर असल्याने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाहीये. या फोटोसह तिने गरोदरपणातील चढ-उतारांबद्दल सांगितले आहे. तसेच या प्रवासात साथ दिल्याबद्दल इलियानाने बॉयफ्रेंडचे आभारही मानले आहेत.
इलियाना लिहिते की, गरोदर असणे ही एक अतिशय सुंदर भावना आहे. आई होणे काय असते हे मला कधी अनुभवायला मिळेल, असे कधी वाटले नव्हते, पण आज मी हे सर्व अनुभवू शकते आणि यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. तुमच्या शरीरात आणखी एक जीव तुमच्यासोबत श्वास घेत आहे, ही भावना कशी असते याचे मी वर्णन देखील करू शकत नाही. अनेकदा मी माझ्या बेबी बंपकडे पाहात असते आणि मी लवकरच या चिमुकल्या जिवाला भेटणार असल्याचा विचार करत असते. पण प्रत्येक दिवस हा सोपा नाही. बरेच प्रयत्न करूनही सर्व काही अवघड वाटते. कधी कधी खूप रडायला येते आणि कधी कधी विनाकारण लाज वाटते.
मला फक्त एवढेच माहीत आहे की, मी माझ्या बाळावर खूप प्रेम करते असे सांगून इलियाना पुढे म्हणते की, जेव्हा मला त्याची गरज असते, तेव्हा तो माझ्यासोबत खडकासारखा खंबीर उभा असतो. जेव्हा मी कोलमडते तेव्हा तो मला सावरतो. जेव्हा मी रडते तेव्हा तो माझे अश्रू पुसतो. मला
हसवण्यासाठी जोक सांगतो किंवा मला मिठी मारतो. जेव्हा जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तो नेहमी माझ्यासाठी उभा असतो. इलियानाने
पोस्टमध्येही तिच्या बॉयफ्रेंडचे नाव सांगितलेले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.