संग्रहित छायाचित्र
वर्षभरात एखादा दुसरा सिनेमा करत असली तरी श्रद्धा कपूर चर्चेत असते. ‘स्त्री २’ चित्रपटानंतर श्रद्धा कपूर ‘ए लिस्टर’ अभिनेत्रींच्या यादीत दाखल झाली आहे. कोणत्याही मोठ्या बॅनरचे चित्रपट न करताही तिने यश मिळवल्याने तिचे कौतुक होत आहे. हे यश सेलिब्रेट करत असतानाच आता तिच्या लव्हलाइफमुळेही ती चर्चेत आली आहे, पण यावर बोलणे ती टाळत आहे. एका मुलाखतीच्या कार्यक्रमात वैयक्तिक आयुष्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर श्रद्धा भलतीच भडकल्याचे पाहायला मिळाले.
श्रद्धा कपूर नेहमीच हसत खेळत संवाद साधताना दिसते. पापाराझी असो किंवा मग पत्रकार... नेहमीच ती मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसते. पण आता एका मुलाखतीत तिला तू कोणाला तरी डेट करतेय , हे खरे आहे का? असे विचारण्यात आले, तेव्हा प्रश्नावर श्रद्धाचा पारा चढल्याचे दिसून आला. एका वृत्तवाहिनीच्या वार्षिक मुलाखतीच्या मोठ्या कार्यक्रमात श्रद्धाला सिने इंडस्ट्रीवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न आल्यावर ती प्रचंड चिडली.
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने श्रद्धाला अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव घेत एक प्रश्न विचारला. 'तुला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, असे आम्ही कार्तिक आर्यनला विचारले होते, त्यात तुझ्या नावाचाही पर्याय होता, पण तो म्हणाला की, या सगळ्याच अभिनेत्री कोणाला तरी डेट करत आहेत. त्याने हे सांगितले हे खरे आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. हा प्रश्न ऐकताच श्रद्धा संतापली. तिचा हा व्हीडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अनंत आणि राधिका अंबानींच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये श्रद्धा एका बिझनेसमनसोबत दिसली होती आणि तेव्हापासून हे दोघं नात्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण श्रद्धाने पुन्हा एकदा आपल्या पार्टनरबरोबर वेळ घालवायला आवडते, असे स्टेटमेंट दिल्याने पुन्ही ती नात्यात असल्याची चर्चा होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.