अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा २०२४ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम सिरीज’मधील या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर ७ ऑक्टोबरला एका भव्य कार्यक्रमात रिलीज होऊ शकतो.या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार, याबद्दल मात्र अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूरसोबत अनेक स्टार्स दिसणार आहेत.
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील नीता-मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला जाऊ शकतो. यावेळी अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ट्रेलर हा चित्रपटासारखा भव्य असावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘सिंघम अगेन’च्या सॅटेलाइट, डिजिटल आणि म्युझिक राइट्सने २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टीसाठी हा सर्वात मोठा नॉन-थिएट्रिकल करार असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकांच्या प्रचंड मागणीमुळे रोहित शेट्टीच्या चित्रपटांनी सॅटेलाइट प्लेयर्सकडून नेहमीच मोठ्या प्रमाणात पैसे कमावले आहेत. त्याच वेळी, डिजिटल प्लेयर्सने सिंघम अगेनला प्रीमियम किंमत देखील दिली आहे.
‘सिंघम अगेन’मध्ये सलमान खान आणि साऊथचा सुपरस्टार प्रभासही दिसणार असल्याची चर्चा अलीकडेच होती. त्यात सलमान 'दबंग' पात्र चुलबुल पांडेच्या भूमिकेत एंट्री करणार असल्याचे ऐकले होते. तथापि, प्रभासबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही वृत्तांनुसाार, सलमान या चित्रपटाचा भाग असणार नाही.
'सिंघम अगेन' या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, जिथे त्याची टक्कर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाशी होणार आहे.
feedback@civicmirror.in