श्रद्धाने केले होते वरुणला प्रपोज!

बाॅलिवूडमधील गोड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर परफाॅर्मन्समुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. तिने सांगितले की, ‘‘मी वरुण धवनला प्रपोज केले. मात्र, त्याने माझा प्रस्ताव नाकारला आणि मला मुली आवडत नसल्याचे सांगितले.’’

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 22 Aug 2024
  • 11:16 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बाॅलिवूडमधील गोड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर परफाॅर्मन्समुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने  एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. तिने सांगितले की, ‘‘मी वरुण धवनला प्रपोज केले. मात्र, त्याने माझा प्रस्ताव नाकारला आणि मला मुली आवडत नसल्याचे सांगितले.’’

अलीकडेच, शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये, श्रद्धाने वरुणने आपले प्रपोजल नाकारल्याचा किस्सा सांगितला.  ती म्हणाली, ‘‘वरुणने माझा प्रस्ताव वयाच्या आठव्या वर्षी नाकारला होता. त्यावेळी आम्ही दोघेही आमच्या वडिलांच्या शूटवर गेलो. माझ्या लहानपणी वरुणवर माझा छोटासा क्रश होता. म्हणून आम्ही डोंगराच्या माथ्यावर गेलो असता मी त्याला प्रपोज केले होते. आम्ही डोंगरावर बराच काळ खेळलो. नंतर मी त्याला म्हणाले की, मी तुला एक गोष्ट सांगते वरुण. मी उलटे बोलेन, नंतर तू त्याचा अर्थ समजून घे. मी त्याला म्हणाले, ‘यू लव्ह आय.’

 या प्रस्तावाला उत्तर देताना वरुण म्हणाला होता, नाही... नाही... मला मुली आवडत नाहीत आणि तो पळून गेला, अशी आठवण सांगताना श्रद्धाला हसू अनावर झाले होते.

वरुण धवनने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' चित्रपटात कॅमिओ केला आहे. मॅडॉक फिल्मच्या सुपरनॅचरल फ्रेंचायझीचा हा पाचवा चित्रपट आहे, ज्यामध्ये या फ्रेंचायझीच्या भेडिया चित्रपटातील पात्रांचाही समावेश होता. ‘स्त्री २’ सोबतच ‘भेडिया २’च्या मेकिंगची हिंट देण्यात आली आहे. चित्रपटात वरुण आणि श्रद्धा यांचे एक गाणेदेखील आहे. यापूर्वी वरुण आणि श्रद्धा ‘एबीसीडी २’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी वरुणचे वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांच्या चित्रपटांमध्ये ‘राजा बाबू,’ ‘हिरो नंबर वन,’ ‘बनारसी बाबू,’ ‘कुली नंबर १’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story