सात कोटींचे गाणे!

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता असून अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून कार्तिक आणि कियारा प्रथमच एकत्र प्रेक्षकांना सामोरे जात आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपला मराठी माणूस समीर विद्वांस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 04:13 pm
सात कोटींचे गाणे!

सात कोटींचे गाणे!

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता असून अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून कार्तिक आणि कियारा प्रथमच एकत्र प्रेक्षकांना सामोरे जात आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपला मराठी माणूस  समीर विद्वांस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कियारा आणि कार्तिक यांची रोमँटिक केमिस्ट्री अफलातून असल्याचे सहजपणे जाणवते. चित्रपटात कार्तिक एक उतावळा नवरदेव असून तो लग्नासाठी उत्सुक आहे. अशातच कार्तिकची भेट कियाराशी होते. मात्र, कियाराचा आधीपासून एक बॉयफ्रेंड आहे. या स्थितीतही कार्तिकला तिच्यावर प्रेम होतं. पुढे कियारासुद्धा कार्तिकसोबत लग्नासाठी तयार होते, पण पुढे असे काहीतरी घडते आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. आता हे नेमकं काय आहे? नक्की काय घडते ? हे मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे शूटिंग काहीच दिवसांपूर्वी संपले. आता त्यातील एक तपशील बाहेर आला असून त्यानुसार ज्या गाण्याच्या शूटिंगने चित्रपटाचे  शूट संपले त्या गाण्यावर निर्मात्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. हा खर्चाचा आकडा ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल यात शंकाच नाही. या गाण्यासाठी चक्क ७ करोड खर्च केले आहेत. हे गाणं एक इंट्रोडक्टरी गाणे असून ते एका वेडिंग थीमवर आधारित आहे. गाण्यात गुजराती, साऊथ इंडियन, मुस्लीम आणि ईसाई पद्धतीने लग्न दाखवले आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी चार वेगवेगळे लग्नाचे सेट उभारण्यात आले होते. या गाण्यासाठी जेवढे पैसे निर्मात्यांनी खर्च केले तेवढे पैसे कियाराला मानधन म्हणून मिळाले असल्याचे सांगण्यात येते. कदाचित, त्याहून कमी मानधन तिला मिळाले असावे. एकूणच भूल - भुलैया नंतर कार्तिक-कियाराचा हा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट सुपरहिट होण्याच्या वाटेवर आहे.

Share this story