क्षमता असूनही मिळाले नाहीत उमेशला मराठी सिनेमे

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते. सध्या दोघेही एकत्र ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहेत. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. प्रियाने आजवर मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम केलेले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 10 Jan 2025
  • 04:23 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते. सध्या दोघेही एकत्र ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहेत. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. प्रियाने आजवर मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम केलेले आहे. तर, उमेश सिनेमांपेक्षा मालिका अन् नाटकांमध्ये प्रेक्षकांना जास्त झळकताना दिसतो. मात्र क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे मिळाले नाहीत, अशी खंत प्रिया बापटने व्यक्त केली आहे.

प्रिया म्हणाली की,  उमेशच्या कामाच्या बाबतीत सांगायचे झाले, तर त्याची निवड ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते. मी खरेच मनापासून सांगते, कारण गेल्या अनेक वर्षांपासून मी त्याचे काम बघत आले आहे. त्याला टेलिव्हिजन आणि नाटकांमध्ये ज्या विश्वासार्हतेने पात्र दिली गेली आहेत. तितक्या विश्वासाने त्याला सिनेमातली पात्र दिली गेली नाहीत. यामागचे कारण मला कधीच समजलेले नाही.  तो मराठी इंडस्ट्रीतला अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने नाटकामध्ये स्वत:साठी प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय उमेशचे आहे. उमेशच्या काम करण्याच्या क्षमतेवर इंडस्ट्रीतसुद्धा कोणालाच शंका नसावी. इतके तो छान काम करतो. त्याच्यात प्रचंड क्षमता आहे पण, सिनेमासाठी तो नेहमी अंडररेटेड राहिला.  त्या प्रकारचे सिनेमे त्याला कधी ऑफरच नाही झाले, तशा भूमिका त्याच्याकडे आल्याच नाहीत. मी आणि उमेश याबद्दल नेहमीच चर्चा करतो. 

मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्रात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे समोरच्या चित्रपटाच्या तोडीसतोड जर मराठी सिनेमा असेल, तरच प्रेक्षक स्वत:हून जाऊन आपला चित्रपट पाहणार. पण, हे नाटकाच्या बाबतीत घडत नाही. साऊथमध्ये चित्रपट हे सांस्कृतिक माध्यम आहे अगदी तसेच मराठीमध्ये नाटक हा आपल्या संस्कृतीचा एक भाग झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक नाटकाला येतात. पण, एक गोष्ट जरूर सांगेन, ज्याप्रकारच्या संहिता आपण मराठी इंडस्ट्रीत आजच्या काळात पाहिल्या पाहिजेत, ज्या प्रकारच्या सिनेमॅटिक लँग्वेजमध्ये आपण आपला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तसे सगळे होत नाही.  हे माझे एक कलाकार म्हणून आणि या इंडस्ट्रीचा भाग म्हणून अत्यंत प्रामाणिक मत आहे, असेही प्रिया बापटने स्पष्ट केले आहे.

Share this story