इमर्जन्सी’ला नवा मुहूर्त

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या तिकीटावर मंडी येथून खासदार झालेली कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या चित्रपटाचा नवीन ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपट येत्या १७ तारखेला रिलीज होत आहे.

Kangana Ranaut,Emergency, Bollywood, Actress,Mandi,BJP ticket,Prime Minister, Indira Gandhi

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या तिकीटावर मंडी येथून खासदार झालेली कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या चित्रपटाचा नवीन ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपट येत्या १७ तारखेला रिलीज होत आहे.

कंगनाने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे . यातून जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि शीखांना खलिस्तानी आणि इतर चुकीच्या पद्धतीने दाखवणारी सर्व दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. १४ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये शीख गोळीबार करताना दिसत होते. त्यांना दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप शीखांनी केला होता. त्यानंतर चित्रपटात बरेच बदल करण्यात आले.

फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंग यांच्याशिवाय शिखांची सर्वोच्च संस्था असलेल्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या सीनवर आक्षेप घेतला होता. सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी, हा चित्रपट मागीलन वर्षी ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु त्याला सेन्साॅर बोर्डाकडून मंजुरी मिळाली नाही.

कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीचा काळ चित्रित करण्यात आला आहे. कंगनानेया चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात तिनेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंग खालसा आणि पाच महिन्यांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सुरक्षारक्षक बेअंत सिंग यांचा मुलगा याने ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दृश्यांवर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते की, 'इमर्जन्सी' या चित्रपटात शीख धर्मीयांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, त्यामुळे समाजातील शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शिखांना फुटीरतावादी किंवा दहशतवादी दाखवले जात असेल तर ते एक खोल कट आहे.

सरबजीत म्हणाले होते की ‘‘हा चित्रपट एक मानसिक हल्ला आहे, ज्यावर सरकारने आधीच लक्ष द्यावे आणि इतर देशांतील शीखांबद्दल द्वेष भडकवणे थांबवावे.’’ चित्रपटात त्यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप शीख समुदायाच्या लोकांनी केला आहे. चित्रपटात शीखांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे, असा आरोपही एसजीपीसीने केला होता. मध्य प्रदेशातील जबलपूर शीख संघाने जबलपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. या चित्रपटावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

सेन्सॉर बोर्डाने आणीबाणीच्या वादग्रस्त दृश्यांचे सत्यता सिद्ध करणारे पुरावे मागितले होते. बोर्डाने म्हटले होते की निर्मात्यांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड मिलहॉस निक्सन यांनी भारतीय महिलांबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीचे स्रोत आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या विधानाचे स्रोत सादर करावे लागतील की भारतीय सशासारखे प्रजनन करतात.

सेन्सॉर बोर्डाने मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडला १० बदलांची यादी पाठवली होती. यातील बहुतांश दृश्यांवर शीख संघटनांनीदेखील आक्षेप घेतला होता. चित्रपटाच्या एका दृश्यात पाकिस्तानी सैनिक बांगलादेशी निर्वासितांवर हल्ला करताना दाखवले आहेत. यामध्ये तो लहान मुले आणि महिलांवर हल्ला करताना दाखवण्यात आला आहे. सेन्साॅर बोर्डाने या सीनवर आक्षेप घेतला होता. बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटातील हा सीन बदला किंवा तो पूर्णपणे हटवण्यास सांगितले होते.

शीख संघटनांच्या आक्षेपानंतर चार महिन्यांपूर्वी सीबीएफसीने चित्रपटाचे प्रमाणपत्र थांबवले होते. सीबीएफसीने या चित्रपटातील तीन सीन हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासोबतच चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यात १० बदल करावे, अशा कडक सूचनाही देण्यात आल्या होत्या. यावर कंगनाने संतापही व्यक्त केला होता. चित्रपटात इंदिरा गांधींची हत्या आणि भिंद्रनवाले दाखवू नये यासाठी आमच्यावर दबाव असल्याचे कंगनाने म्हटले होते.

feedback@civicmirror.in

Share this story