संग्रहित छायाचित्र
संजय दत्त आणि अर्शद वारसी यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपट लोकांना खूप आवडला. या चित्रपटात सर्किट बनलेल्या अर्शद वारसीच्या मजेदार संवादांनी लोकांना हसवले. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अर्शदने सांगितले की, चित्रपटातील बहुतांश संवाद त्याने स्वत: ऑन-द-स्पॉट केले आहेत.
यासंदर्भात बोलताना अर्शद म्हणाला, ‘‘मी माझ्या कामाकडे जास्त पाहत नाही. पण जेव्हा जेव्हा मी ते पाहतो तेव्हा मला वाटते की मी चांगले केले आहे. मुन्नाभाईमध्ये मी जे काही बोललो आहे, ते सर्व इम्प्रोव्हाईज आहेत आणि तेही तयारीशिवाय.’’
एसी रूममध्ये स्क्रिप्ट लिहिणे आणि सेटवर जाऊन लोकांना भेटणे आणि नंतर स्क्रिप्ट लिहिणे यात खूप फरक आहे. जेव्हा कोणी तुम्हाला कथा सांगते तेव्हा ती वेगळी परिस्थिती असते. पण जेव्हा तुम्ही एखादा सीन शूट करत असाल तेव्हा सगळंच बदलतं. म्हणून, स्क्रिप्टला लक्षण रेषा मानत नाही. राजकुमार हिरानीच्या चित्रपटात मी हेच केलं होतं असे सांगून अर्शद पुढे म्हणाला, ‘‘अर्शद वारसी पुढे म्हणाला, ‘‘जेव्हा मला संवाद दिला जातो, तेव्हा मी आधी सीन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. विनोदी संवाद असेल तर ते कसे करायचे ते मला पटकन समजते. मात्र, माझ्यासोबत काम करणाऱ्यांना वाटते की यात मजा काय आहे. पण हेच सीन नंतर बघितल्यावर ते खूपच मजेदार दिसते. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी दिग्दर्शकाला काही सुधारणा विचारतो तेव्हा तो लगेच म्हणतो की हो, छान दिसेल.’’
नुकताच अर्शदचा ‘बंदा सिंह चौधरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील जातीय हिंसाचाराचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात अर्शदसोबत मेहर विज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अर्शद ‘फालतू,’ ‘इश्किया,’ ‘जॉली एलएलबी,’ ‘देढ इश्किया,’ ‘मुन्नाभाई एमबीबीएस,’ ‘लगे रहो मुन्नाभाई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.