बंदूकीच्या धाकावर गायले गाणे

बॉलिवूडमध्ये ८० ते ९०च्या काळात आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणून कुमार सानू ओळखले जातात. सुरांचा बादशाह म्हणून त्यांची आज ओळख आहे. पण त्यांचा इथवरचा प्रवास अतिशय खडतर होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 24 Sep 2024
  • 04:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूडमध्ये ८० ते ९०च्या काळात आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणून कुमार सानू ओळखले जातात. सुरांचा बादशाह म्हणून त्यांची आज ओळख आहे. पण त्यांचा इथवरचा प्रवास अतिशय खडतर होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. २३ सप्टेंबर रोजी कुमार सानू यांचा वाढदिवस आहे.  त्यांचे वडील पशुपती भट्टाचार्य हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. कुमार सानू यांना खरी ओळख १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील त्यांची गाणी प्रेक्षकांनी खूप पसंती केली. त्यानंतर कुमार सानू यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचे प्रत्येक गाणे हे हिट होताना दिसले. आजही अनेकजण कुमार सानू यांची गाणे आवर्जून ऐकतात.

कुमार सानू यांनी एका शोमध्ये करिअरच्या सुरुवातीला घडलेला किस्सा सांगितला आहे. 'मी एकदा पाटणा येथे शो करायला गेलो होतो. मी तेथे काही गाणी गायली, जी लोकांना खूप जास्त आवडली. यानंतर मी पाहिले की काही लोक समोर रायफल घेऊन बसले होते. त्यांना माझे गाणे आवडले की ते फायर करायचे. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मी 'मैं दुनिया भुला दूंगा' हे गाणे गायलो आणि दुसरे गाणे सुरू होताच बंदूकवाला आला आणि गाणे कोणी थांबवले, हे माझे आवडते गाणे आहे असे सांगितले. ते सर्व दारूच्या नशेत होते. त्यामुळे मी घाबरलो होतो. सर्वजण नशेत असताना एकमेकांचे ऐकत नव्हते. त्यांच्यामधील एक जण उठला आणि माझ्याजवळ आला. तो मला म्हणाला ती सानू जी एक गाणे माझ्यासाठी पुन्हा गा.. मी थोडा घाबरलो... मी म्हणालो तुझ्यासाठी दुसरे गाणे गातो.. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्यामुळे मी  'मैं दुनिया भुला दूंगा' हे गाणे १६ वेळा गायले. कारण मला बंदूकीचा धाक दाखवण्यात आला होता. 

काही वेळानंतर बंदूक हातात घेतलेल्या व्यक्तीही स्टेजवर आल्या. गोळीबार करत गाणे गात होत्या. वातावरण बिघडत असल्याचे पाहून मी तेथून पळ काढला. पण तेंव्हा पहाटेचे ५ वाजले होते.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story