‘टीडीएम’च्या समर्थनार्थ रोहित पवार यांची पोस्ट
भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण, बऱ्याच ठिकाणी ‘टीडीएम’चे शो रद्द केले गेले. तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याने दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमने या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. एका चित्रपटगृहात याबद्दल बोलताना यातील कलाकारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो व्हीडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यानंतर ठिकठिकाणी या चित्रपटाची चर्चा व्हायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर, तर बऱ्याच लोकांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला, पण या सगळ्या गोष्टींमुळे भाऊराव कऱ्हाडे यांनीच हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून घ्यायचा निर्णय घेतला. आता त्यानंतर ९ जूनला हा चित्रपट पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे. तरी अजून परिस्थिती जैसे थेच आहे. अद्याप चित्रपटाला प्राईम टाइम म्हणजेच संध्याकाळ आणि रात्रीचे शो मिळालेले नाहीत.
याबरोबरच आपण सगळ्यांनी हा चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहून अशा मराठमोळ्या चित्रपटांना प्रोत्साहन द्यायला हवे असेही रोहित पवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या चित्रपटातून कालिंदी निस्ताने आणि पृथ्वीराज थोरात हे दोन नवे चेहेरे लोकांसमोर येणार आहेत. याबरोबरच चित्रपटाचे कथानकही वेगळ्या धाटणीचे आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.