संग्रहित छायाचित्र
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारे सीबीआयचे अपील न्यायालयाने फेटाळले आहे.
उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचे वडील आणि भावाविरुद्ध जारी केलेले लुकआउट परिपत्रक रद्द केले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई म्हणाले, ‘‘आम्ही एक इशारा देत आहोत. तुम्ही छोट्या-छोट्या याचिका दाखल करत आहात कारण एक आरोपी हा उच्चभ्रू व्यक्ती आहे. यासाठी नक्कीच मोठी किंमत मोजावी लागेल.’’
अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास तपास करत आहेत. मात्र, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. यानंतर २०२०मध्येच सीबीआयने रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात लुक आउट परिपत्रक जारी केले होते.
फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रिया आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध जारी केलेले सीबीआय लूक-आउट परिपत्रक रद्द केले होते. यानंतर सीबीआयने परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.