पनीर ठेचा अन् बरच काही...मलायका अरोराच्या रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड व्हायरल

मलायका अरोराने नुकतंच व्यवसायक्षेत्रात पाऊल ठेवले. तिने तिचा मुलगा अरहान खानबरोबर नवीन व्यवसाय सुरू केला. या दोघांनी मुंबईतील वांद्रे भागात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन रेस्टॉरंट सुरू केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 31 Dec 2024
  • 05:01 pm
bollywood,malaika arora,Entertainment news,viral post,marathi entertainment,Malaika Arora, restaurant, Maharashtrian dish, masala khichdi, unique menu, food price, celebrity restaurant,Malaika Arora, restaurant menu, Maharashtrian food, masala khichdi, high price, Marathi cuisine, celebrity dining

मलायका अरोराने नुकतंच व्यवसायक्षेत्रात पाऊल ठेवले. तिने तिचा मुलगा अरहान खानबरोबर नवीन व्यवसाय सुरू केला. या दोघांनी मुंबईतील वांद्रे भागात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन रेस्टॉरंट सुरू केले. ‘स्कार्लेट हाऊस’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. तिच्या रेस्टॉरंटची खासियत असलेले काही पदार्थ आहेत. त्या पदार्थांची नावे आणि दर याची माहिती समोर आली आहे.

 

मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ‘स्कार्लेट हाऊस’ हे रेस्टॉरंट वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे. हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवलेले आहे. हे रेस्टॉरंट आतून खूपच सुंदर आहे. शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक लक्षवेधी ठरतो.  स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ बीना नोरोन्हा या आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात.

रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. आता मलायकाच्या रेस्टॉरंटमधील मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात काही पदार्थ व त्याचे दर लिहिले आहेत. हे पदार्थ मलायकाच्या रेस्टॉरंटची खासियत आहेत.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेन्यू कार्डचा एक फोटो रिशेअर केला आहे, त्यानुसार या रेस्टॉरंटमध्ये पनीर ठेचा मिळतो. त्याची किंमत ५२५ रुपये आहे. मसाला खिचडी ५५० रुपयांची आहे, तर कॅरेमलाइज्ड ओनियन पास्ता ५५० रुपयांना मिळतो. मलायकाच्या या रेस्टॉरंटला अनेक सेलिब्रिटी भेट देताना दिसत आहेत. नुकतेच अरबाज खानचे कुटुंब ‘स्कार्लेट हाऊस’मध्ये लंचसाठी गेले होते. अरबाज खान, सलीम खान, सलमा खान, अलविरा खान, निर्वाण खान, हेलन यांच्यासह खान कुटुंबातील इतर सदस्यांनी या रेस्टॉरंटमध्ये मलायका अरोराबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला होता.

Share this story

Latest