File Photo
मी सलीम-जावेद यांना लेखक मानत नाही. हे एक वादग्रस्त वक्तव्य म्हणून घेऊ शकता, पण ते पटकथा चोर आहेत. संपूर्ण जग त्यांची स्तुती करते. मी नाही. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत गोष्टींची नक्कल करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. सलीम-जावेद लेखक नाही कॉपी-रायटर आहेत, अशा शब्दांत पटकथालेखक अमित आर्यन यांनी सलीम-जावेद यांच्यावर निशाणा साधला आहे.
पटकथालेखक अमित आर्यन म्हणाले की, सलीम-जावेद यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेची कहानीही कॉपी केली होती. शोले हा सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीचा यशस्वी चित्रपट आहे. या जोडीने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये या दोघांना घेऊन चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या ‘एफआईआर’ या मालिकेचे लेखक अमित आर्यन यांनी सलीम जावेद हे लेखक असल्याचे मानण्यास नकार दिला आहे. ते दोघे लेखक नाही तर चांगले सेल्समॅन होते.
'शोले' चित्रपट जो एका व्यक्तीच्या आयुष्यावर आहे ज्याचे हात दरोडेखोरांनी कापले आहेत. ते दोन लोकांच्या मदतीने त्यांचा सूड घेऊ इच्छितात. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याच्या अगदी थोडे दिवस आधी 'मेरा गांव मेरा देश' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. विनोद खन्ना यांनी दरोडेखोराची भूमिका साकारली होती आणि त्या भूमिकेचे नाव जब्बर सिंग होते, शोलेमध्ये हे नाव बदलून गब्बरसिंग करण्यात आले होते. तिथे जयंत यांनी एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती तर इथे ती पोलिसाची भूमिका होती. तिथे फक्त एक हात कापण्यात आल्याचे दाखवले होते. इथे तर ठाकुरचे दोन्ही हात कापून टाकले होते. तिथे धर्मेंद्रने सूड घेतला आणि इथे अमिताभ बच्चनने सूड घेतला.'
अमित आर्यन पुढे म्हणाले की शोलेची पटकथा ही ‘दो आंखें और बारह हाथ’ आणि ‘सेवन समुराई’ शी मिळती जुळती आहे. छोट्या पडद्यावर आतापर्यंत सगळ्यात लोकप्रिय शोमधील एक ‘एफआईआर’ च्या राइटर अमित आर्यननं पुढे सांगितलं की सलीम-जावेदची जोडीने लिहिलेला ‘दीवार’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स चित्रपट ‘गंगा जमुना’ मधून कॉपी करण्यात आला आहे. बॉलिवूडच्या या दिग्गज जोडीनं सलीम-जावेद यांनी २२ चित्रपटांसाठी काम केले. त्यांनी ‘शोले’, ‘दीवार’, ‘काला पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘दोस्ताना’, ‘मिस्टर इंडिया’ सारख्या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. पुढे त्यांच्यात क्रिएटिव्ह मतभेद वाढू लागले आणि त्यांनी पुढे एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला.
feedback@civicmirror.in