संग्रहित छायाचित्र
बाॅलिवूड मधील हाॅट ॲण्ड सेक्सी हिरोईन नोरा फतेहीने (Nora Fatehi) करिअरच्या प्रारंभीच्या टप्प्यात तिला काम मिळवताना येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितले. नोरा म्हणाली, ‘‘सुरुवातीला मला खूप नकाराचा सामना करावा लागला, जे माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. पण त्यानंतरही मी हार मानली नाही आणि मेहनत करत राहिले. त्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले. यशाच्या वाटेवरील हा प्रवास अजूनही सुरुच आहे.’’
नोरा म्हणाली, यश मिळविण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व दरवाजे उघडतात. पण मी माझ्यासाठी नसलेले दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही, असे नोरा मेलबर्नच्या इंडियन फेस्टिव्हलमध्ये राजीव मसंद यांच्याशी बोलताना म्हणाली,
सुरुवातीच्या काळातील नकारांबद्दल हळवी होत सांगताना नोरा म्हणाली, ‘‘मी एकदा यशराज फिल्म्सच्या ऑडिशनला गेले होते. मी माझे संवाद बोलले. मला वाटलं मी छान ऑडिशन दिली आहे. पण त्यांनी मला परत फोन केला नाही आणि मी तितकी चांगली नाही असे सांगून प्रतिक्रिया दिली. हे ऐकून मी रागाच्या भरात मोबाईल फोडला होता. ज्या प्रकल्पांसाठी मला नाकारण्यात आले. त्याला फारसे यश मिळाले नाही. ते चित्रपट आले तेव्हा ते फ्लॉप झाले किंवा फारच वाईट झाले. त्यावेळी मला वाटायचे, अरे देवा, मी या चित्रपटांसाठी रडले? मी माझा फोन तोडला? कदाचित त्या चित्रपटामुळे माझे करिअरही उद्ध्वस्त झाले असते, म्हणून आता मी जे आपल्याला मिळाले नाही, त्यावर विचार न करायला शिकले आहे.’’
जेव्हा बहुतेक लोक इंडस्ट्रीत येतात तेव्हा त्यांना वाटते की मी बाहेरून आले आहे. त्यामुळे दुर्लक्ष तसेच कमी प्रमाणात संधी, या गोष्टी माझ्या अंगवळणी पडल्या आहेत. माझा विश्वास आहे की आत्मविश्वास आणि समर्पण असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुमची मेहनत त्यांना विचार करण्यास भाग पाडते, असे नोराने आवर्जून सांगितले.
नोराने २०१८ मध्ये आलेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हे गाणे पसंत केले गेले. एवढेच नाही तर यूट्यूबवर एक अब्जाहून अधिक व्ह्यूज आहेत. मात्र, यासाठी नोराला पैसे मिळाले नाहीत. एका मुलाखतीत नोराने सांगितले की, जेव्हा तिला ‘दिलबर’ आणि ‘कमरिया’ची ऑफर मिळाली तेव्हा ती भारत सोडण्याचा विचार करत होती. पण नंतर तिला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे वाटले.
‘दिलबर’ या गाण्यासाठी मला जे कपडे मिळाले. मी ते घालण्यास नकार दिला कारण ते खूप लहान होते. मला समजले, हे एक सेक्सी गाणे आहे. पण आपण ते असभ्य बनवू नये. यानंतर, माझ्यासाठी एक नवीन ड्रेस बसविण्यात आला, ज्यामध्ये मी खूपच आरामदायक होते, अशी आठवणही नोराने यावेळी सांगितली.