‘त्यांची’ उणीव भासते...

अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर यांनी १९८५ मध्ये अभिनेत्री किरण खेरशी लग्न केले. दोघांच्या लव्ह लाईफची खूप चर्चा झाली. नुकतेच अनुपम यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले.

Anupam Kher,Married,Actress, Kiran Kher,Versatile

File Photo

अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर यांनी १९८५ मध्ये अभिनेत्री किरण खेरशी लग्न केले. दोघांच्या लव्ह लाईफची खूप चर्चा झाली. नुकतेच अनुपम यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. पत्नी किरण यांचा मुलगा सिकंदर याला आपले नाव दिले असले तरी ते म्हणाले. पण, त्यांना कधी कधी मुलांची कमतरता जाणवते.

एका पॉडकास्टमध्ये अनुपम यांना विचारण्यात आले की, त्यांना स्वतःची मुले नसण्याची उणीव भासते का? यावर अनुपम म्हणाले, ‘‘अर्थातच... मला स्वतःची मुले नसण्याची कमी भासते. यापूर्वी असे घडत नव्हते. परंतु गेल्या ८-१० वर्षांपासून मला एकटेपणा जाणवत आहे. मी सिकंदरबाबत खूप आनंदी आहे. पण माझी मुलं लहानापासून मोठी होताना पाहिली असती तर कदाचित तो आनंद वेगळाच झाला असता. हे मी प्रामाणिकपणे सांगत आहे. माझ्या आयुष्यातील ही शोकांतिका नाही, हेही तितकेच खरे आहे.’’

 मी माझ्या आयुष्यात बहुतेक वेळा व्यग्र होतो, पण आता वयाच्या ५०-५५व्या वर्षी मला आयुष्यात एक शून्यता, एक पोकळी जाणवते. किरण आणि सिकंदर आपापल्या आयुष्यात व्यग्र असल्यामुळेदेखील हे घडले असावे, असेही अनुपम यांनी सांगितले.

अनुपम यांनी १९८५ मध्ये पहिली पत्नी मधुमालती आणि किरण खेर यांनी पहिले पती उद्योगपती गौतम बॅरी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर लग्न केले. दोघांचे लग्न झाले तेव्हा किरण यांचा मुलगा सिकंदर हा चार वर्षांचा होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story